कृषि भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मुसळधार पावसाने वसाहतीत शिरला पाणी भात रोवणी धडाक्यात

Summary

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क तुमसर:- तालुक्यात आठवड्यापूर्वी पावसाने हुलकावणी दिल्याने पऱ्हे कापण्याच्या मार्गावर असताना अचानक गुरुवारच्या सायंकाळी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने शेतकरी चांगलाच सुखावला असून भात लावणी मोठ्या जोमाने प्रारंभ झाली. तर शहरातील बऱ्याच भागात पावसाने वेढल्याची स्थिती शहरवासीयांना पाहाव्यास […]

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
तुमसर:- तालुक्यात आठवड्यापूर्वी पावसाने हुलकावणी दिल्याने पऱ्हे कापण्याच्या मार्गावर असताना अचानक गुरुवारच्या सायंकाळी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने शेतकरी चांगलाच सुखावला असून भात लावणी मोठ्या जोमाने प्रारंभ झाली. तर शहरातील बऱ्याच भागात पावसाने वेढल्याची स्थिती शहरवासीयांना पाहाव्यास मिळाली. बुधवार व गुरुवारच्या संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. सतत दीड तास पाऊस व विजेच्या तांडव नृत्य घाबरवणारा होता. मुसळधार पावसाने झोपल्याने तलाव बोड्या भरत आल्या असून नदी-नाले वाहू लागले आहेत. शहरात अतिक्रमणाने पावसाचे पाणी जायला मार्ग मिळत नसल्याने बऱ्याच भागात व रस्त्यावरून पाणी वाहून जात आहे. नाल्या वेळेच्या अवधीत साफ न झाल्याने घाण पाणी वाहून नेत आहे. रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. भात खाचरांमध्ये प्रथमच पाणी साचल्याने भात लावणीला प्रारंभ झाला आहे. पाऊस असाच पडत राहिला तर २४,५०० हेक्टरातील रोवणे जुलै अखेरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. शेतकरी आणि परंपरागत शेतमजूर शेती कामात व्यस्त आहेत. वर्षागणिक शेतमजुरांची संख्या कमी होत चालल्याने शेतीच्या मशागतीवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. नवीन मजूर शेतीकाम नाकारतो त्यामुळे लगतच्या छत्तीसगड भागातून मजूर आयात करावे लागत आहे. पूर्वी बैल जोडीने होणारी शेती आता ट्रॅक्टर द्वारे करण्यात येत आहे. पाऊस एकाकी कोसळल्याने मजूर बैल जोडी याचे दर दीडपटीने वाढले आहेत. भात लावणी मजुरीच्या दरात पण वाढ झाली आहे. ट्रॅक्टरचे दर ताशी दर सुद्धा वधारले आहेत. तुमसर तालुक्यात ३ मध्यम प्रकल्प, ४३ लघु प्रकल्प, २८२ खाजगी तलाव, ३१९ मालगुजारी तलाव, ३ उपसा सिंचन योजना, २५६० ओलिताच्या विहिरीपासून १८,०४० हेक्टर भात शेतीला ओलीत होत असते. दोन दिवसाच्या पावसाने सिंचनाचे साठे भरत आले आहेत. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध शेतीतंत्राची माहिती देणाऱ्या कृषी खात्याने गेल्या बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांपासून फारकत घेतली असल्याने शेती-शेतकरी-कृषीचे नाते संपुष्टात आले आहे. सांगिव व ऐकिव माहितीच्या आधारे बी-बियाणे-खते यांचा वापर चालला आहे. संगणकीकृत युगात कृषी विभागाची उपयोगिता संपली असल्याचे प्रगतिशील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *