महाराष्ट्र रोजगार हेडलाइन

मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्यासमवेत पगारवाढीच्या झालेल्या चर्चेचे अपडेट

Summary

दि. ०७.०३.२०२४ रोजी पगारवाढीवर ३३ संघटना बरोबर एकत्र चर्चा झाली. सर्व संघटनांनी बेसिक मध्ये ३० टक्के व सर्व भत्त्यामध्ये १०० टक्के वाढ प्रस्ताव मा.देवेंद्रजी फडवणीस ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समोर ठेवला. प्रशासनाच्या वतीने बेसिक मध्ये १५ टक्के व अलाऊंसेस मध्ये […]

दि. ०७.०३.२०२४ रोजी पगारवाढीवर ३३ संघटना बरोबर एकत्र चर्चा झाली. सर्व संघटनांनी बेसिक मध्ये ३० टक्के व सर्व भत्त्यामध्ये १०० टक्के वाढ प्रस्ताव मा.देवेंद्रजी फडवणीस ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समोर ठेवला. प्रशासनाच्या वतीने बेसिक मध्ये १५ टक्के व अलाऊंसेस मध्ये १०० टक्के वाढ तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांकरीता विशेष विचार करण्याचे आश्वासन दिले.आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर २ दिवसात स्वतंत्र बैठक घेण्याचे सुद्धा त्यांनी जाहीर केले. या बैठकीनंतर परत सर्व ३३ संघटनांची कमला नेहरू पार्क मैदान मुंबई येथे बैठक झाली.व ऊर्जामंत्री यांनी जी पगारवाढ जाहीर केली त्याबद्दल सर्व संघटनांनी असमाधान व्यक्त केलं व तसे लेखी त्यांना सर्व ३३ संघटनांच्या वतीने पत्र देऊन कळविण्याचे ठरले. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स पlफेडरेशनचे सभासद व पदाधिकारी महाराष्ट्र मधून पगारवाढीबाबत विचारणा करत असल्यामुळे हा खुलासा करण्यात येत आहे.
आपले विश्वासू
कॉम्रेड मोहन शर्माजी अध्यक्ष
कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस
कॉम्रेड महेश जोतराव अतिरिक्त सरचिटणीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *