BREAKING NEWS:
आरोग्य पुणे महाराष्ट्र हेडलाइन

मानसिक आरोग्य सुदृढ असेल तर जीवन आनंदी व सुखी होते :- डॉ जगदिश राठोड

Summary

पुणे- नुकतेच कस्तुरी शिक्षण शास्त्र महाविद्यालय शिक्रापूर येथे संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठोड यांनी मानसिक आरोग्य बाबत मार्गदर्शन व उपचार कार्यशाळा घेतली. त्यावेळेस म्हटले की आजच्या धकाधकीच्या,ताणतणाच्या काळात व स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुदृढ असेल तर तो आनंदी […]

पुणे- नुकतेच कस्तुरी शिक्षण शास्त्र महाविद्यालय शिक्रापूर येथे संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठोड यांनी मानसिक आरोग्य बाबत मार्गदर्शन व उपचार कार्यशाळा घेतली. त्यावेळेस म्हटले की आजच्या धकाधकीच्या,ताणतणाच्या काळात व स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुदृढ असेल तर तो आनंदी व सुखी राहतो

सविस्तर वृत्त असे की कस्तुरी शिक्षण संस्थेत बी एड ,एम ए एज्युकेशन व डी एस एम च्या विद्यार्थ्यांकरिता त्यांचे प्रत्यक्ष कर्मभूमी असेल त्या ठिकाणी कार्य करत असताना मानसिक आरोग्य चांगले राहावे व त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं कार्य घडावे ते आनंदी व सुखी राहावे याकरिता मानसिक आरोग्य दिनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ जगदिश राठोड हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक मनीषा कोठाळे व प्राध्यापिका सीमा मस्के मॅडम उपस्थित होत्या तसेच याप्रसंगी प्राध्यापक गजानन हळदे, प्राध्यापक पोमणे सर, प्राध्यापक खैरे सर व्यासपीठावर स्थानापन्न झाले होते. प्रत्यक्षात मनाचे आरोग्य कशामुळे ढासळल्या जाते, त्याची विविध कारणे यावर चर्चा करून प्रत्येक व्यक्तींच्या मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांच्या कार्यावर कोणत्या गोष्टी या परिणाम करतात, त्या दूर करण्यासाठी सर्वात पहिले मन व शरीर हे सुदृढ ठेवण्यासाठी आपले परिसर ,शाळा , समाज, नातेवाईक मित्रपरिवार यांच्यातील सलोख्याचे संबंध व त्यांच्यासोबत ज्या कामानिमित्त होणाऱ्या वार्तालाप हे सकारात्मक असेल तर कुठल्याही प्रकारचं वादविवाद न होता. ताण तणाव निर्माण होत नाही व मानसिक आरोग्य अत्यंत चांगल्या प्रकारचे राहतो , त्याकरिता स्वयं सूचना कशा द्याव्या व संमोहनाद्वारे मानसिक समस्या कशा सोडवाव्या याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन करण्यात आले .

या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक यांच्यासोबत प्रश्न उत्तरे. द्वारे शंका निवारण करण्यात आल्या व त्यानंतर शेवटी कार्यक्रमाचे शेवट करताना सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिक्रिया घेण्यात आला .या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका सीमा मस्के मॅडम यांनी केले तर आभार प्राध्यापिका मनीषा कोठाळे यांनी मानले व या कार्यक्रमाचा भरपूर लाभ बीएड व सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून घेतला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *