महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ‘महालक्ष्मी सरस’ला भेट देऊन पाहणी

Summary

मुंबई, दि. 2 : वांद्रे येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस 2023-24’ ला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज भेट दिली. या प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या प्रदर्शनात […]

मुंबई, दि. 2 : वांद्रे येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस 2023-24’ ला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज भेट दिली. या प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू , ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावचे भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत  ग्रामीण भागातील चव चाखण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला संधी मिळत असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे उपंचालक महेश कारांडे, अवर सचिव धनवंत माळी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *