महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज केंद्रात शासकीय आभियांत्रकी विद्यालयाच्या ६ विद्याथ्यांना “संशोधन सहाय्यक” म्हणून संधी
Summary
स्पेशलायझेशनच्या युगात नवनवीन संशोधने आणि सुधारणा याला नेहमीच चालना व वाव देण्याची आवशक्यता निर्माण होत असते. वीज उत्पादनाच्या कठीण व आतिशय गुंतागुंतीच्या तांत्रिक स्वरूपाच्या कामात दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी महानिर्मितीच्या ३३४० मेगावाट क्षमतेच्या चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राने नुकतेच शासकीय आभियांत्रकी […]
स्पेशलायझेशनच्या युगात नवनवीन संशोधने आणि सुधारणा याला नेहमीच चालना व वाव देण्याची आवशक्यता निर्माण होत असते. वीज उत्पादनाच्या कठीण व आतिशय गुंतागुंतीच्या तांत्रिक स्वरूपाच्या कामात दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी महानिर्मितीच्या ३३४० मेगावाट क्षमतेच्या चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राने नुकतेच शासकीय आभियांत्रकी महाविद्यालय चंद्रपूर येथे पद्युत्तर आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या एकूण ६ विद्याथ्यांना “संशोधन सहाय्यक” म्हणून सहभागी करून घेण्याबाबत सामंजस्य करारवर (एम.ओ.यु.) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सामंजस्य करारा दरम्यान शासकीय आभियांत्रकी महाविद्यालय चंद्रपूर यांचे तर्फे प्राचार्य डॉ. एस. जी. आकोजवार, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी डॉ. पी. एस. लोंढे, ईलेक्ट्रीकल विभागप्रमुख डॉ. अनंत देशपांडे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. राजेश राजूरकर, उपकरणीकरन विभागप्रमुख डॉ. दिलीप माघाडे व सिविल विभागप्रमुख प्रा. राजेश पेचे तर महानिर्मितीच्या चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता श्री. पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता प्रशासन श्री. सुहास जाधव, कार्यकारी अभियंता तांत्रिक श्री. रामेश्वर सोनेकर व प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशिक्षण श्री. राजकुमार गीमेकर, यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
औष्णिक वीज उत्पादनाच्या दैनंदिन कार्यात मेकॅनिकल, ईलेक्ट्रीकल, उपकरणीकरन, थर्मल, पॉवर, कॉम्पुटर, सिविल आभियांत्रकी सारख्या विविध आभियांत्रकी संवर्गातील तांत्रिक कामांचा परस्पर संबंध असल्याने हे काम अतिशय जिकरीचे व गुंतागुंतीचे आणि स्पेशलायझेशन स्वरूपाचे असते. अत्याधुनिक तंत्रज्ञानात तरुण पिढी अग्रेसर असल्याने आभियांत्रकी शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी हि सुवर्ण संधी आहे. यामध्ये, पद्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्धाना एक वर्ष प्रतिमाह २५ हजार रुपये प्रशिक्षण भत्ता तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्धाना तीन महिने प्रतिमाह २० हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे.
सदर योजने अंतर्गत शासकीय आभियांत्रकी महाविद्यालय चंद्रपूर मधून प्रत्येकी ३ पद्युत्तर आणि ३ पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्धांची निवड मुलाखती घेऊन करण्यात आलेली आहे. यामध्ये पद्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मेकॅनिकल विभागातून चैतन्य पोटनुरवार, वैष्णवी फुलझले व ईलेक्ट्रीकल विभागातून मोनाली नारायणे तसेच पदवी शिक्षण घेणाऱ्या मेकॅनिकल विभागातून कृष्णा वंजारी, ईलेक्ट्रीकल विभागातून श्रुतिका ठाकरे व उपकरणीकरन विभागातून दुर्गेश राठोड या विध्याथांची निवड करण्यात आलेली आहे. प्रशिक्षण कालावधी यशस्वी पूर्ण केल्यानंतर ह्या विद्यार्धाना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.