भीम जयंती म्हणजे काय ?
भीम जयंती म्हणजे काय ??
लेखक :- महेश देवशोध
( राठोड )
पोलीस योद्धा वृत्तसेवा
आपण सर्वप्रथम हे समजून घ्यावे की , भीम जयंती म्हणजे काय ? याचा अर्थ काय आहे ?80% लोक असे म्हणतात की जयंती म्हणजे बाबासाहेबांचा जन्म दिवस 14 एप्रिल. पण त्यांनाच आपण असा प्रश्न केला की जयंती चा अर्थ काय होतो ? जयंती का साजरी केली जाते ? जयंती कोणाकोणाची साजरी केली जाते . असे असंख्य प्रश्न आहेत . आपल्यातलेच काही जण असे म्हणतील की जयंती मोठ्या माणसाचीच साजरी केली जाते मग हा प्रश्न निर्माण होतो की मोठा म्हणजे कशाने पैशाने तर काहीजण म्हणतील नाही ज्ञानाने, बुद्धीने तर काही मोजके जण म्हणतील की जो सर्व प्राण पणाला लावून अविरतपणे समाजासाठी रात्रंदिवस झटत असतो . त्याचं संपूर्ण आयुष्य जनहितासाठी खर्च करतो अश्या व्यक्तीची जयंती साजरी केली जाते .
जयंती साजरी करण्याची समाजातील वेगवेगळ्या लोकांची वेगळी पद्धत आहे . आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समाज तर आपला एकच आहे. मग वेगवेगळे लोक असा का बरं उल्लेख केला असेल ? तर त्यासाठी आपल्या समाजातील काही लोक स्वतःला अतिशय हुशार समजणारे महाभाग यांना फक्त बाबासाहेब आठवतात तर किंवा आपलेसे वाटतात ते 14 एप्रिलाच. त्यांना मी बौद्ध असल्याचा गर्व 14 एप्रिल आज होतो . किंवा येतो . एरवी ते महार हिंदु म्हणून समाजात वावरत असतात. ज्या सर्व सुख सुविधा सवलती बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या आहेत त्या सर्व सवलतीचा पुरेपूर फायदा एक बुद्ध म्हणूनच घेत असतात. ] ते सुविधा घेण्यापुरतेच बुद्ध असतात पण त्यांच्या डीएनएमध्ये हिंदू महार म्हणूनच आपणास दिसेल अशी घाणेरडी मानसिकता आपल्याला बदलायला हवी . यामध्ये बदल व्हायलाच पाहिजे .
या बाबींना कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत . जयंती साजरी करायची पद्धत आपल्या बांधवांनी काळानुसार बदलायला पाहिजे . जयंती नाचून नाही तर वाचुन साजरी करायला हवी ही काळाची गरज आहे . आज समाजातील जो मुलगा शिकतो, उच्चशिक्षण घेतो ज्या वेळेला तो शिक्षण घेत असतो त्या वेळेला शाहू-फुले-आंबेडकर छातीठोकपणे समाजाला सांगत सांगत असतो पण जशी बाबुला नोकरी लागते तसा बाबू हवेमध्ये झूमतो त्याचा पाय पण जमिनीवर राहतच नाही आणि लग्न झालं तर मग बघायचं कामच नाही. त्याची मानसिकता फक्त एकच बनते हम दो हमारे दो एवढ्यापुरतीच मर्यादित राहते. त्याला समाजाशी काही देणे घेणे नसते. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य आपल्यासाठीच खर्च केले हे सर्व तो विसरतो.
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची धुरा खांद्यावर घेऊन चालायची जिम्मेदारी सर्व समाजातील लोकांची आहे. यामध्ये मोठा वाटा म्हणजे भन्तेनजींचा आहे पण गौतम बुद्धाच्या कालखंडामध्ये या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हायचा तसा प्रचार आणि प्रसार किंचितच कोणाच्या नजरेला पडला असेल कुणास ठाऊक मी आपल्या माणसावर टीकात्मक बोलत नाही . परंतु कुठेतरी खंत वाटते याची , आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्याप्रमाणे भन्तेजिनी आणि सुशिक्षित बांधवांनी आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे.
आपल्या समाजातील खूप लोकांना पाली भाषा अवगत नाही . पण महत्त्वाचे म्हणजे बुद्ध धम्म हा पाली भाषेत आहे . त्यामुळे बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतच नाही . त्यामध्ये त्रिशरण , पंचशिल, अष्टांगिक मार्ग इत्यादी असेल ते पाली भाषेतच सांगायच पण त्याचा उल्लेख हा मराठीत पण करा.
जेणेकरून ते आपल्या बांधवांन पर्यंत जाईल. मूळ उद्देश काय आहे ? हा उद्देश आपल्या लोकांपर्यंत जातच नाही याचा उलट परिणाम असा होतो की जे आपले अशिक्षित बांधव आहेत ते फक्त हा एक मंत्र आहे असे गृहीत धरतात. माझी आपल्या समाजाला एवढेच सांगणे आहे की जो कोणी बुद्ध धम्माचा उपदेश करत असेल किंवा लग्नप्रसंगी त्रिशरण , पंचशिल, अष्टांगिक मार्ग सांगत असेल ते पाली भाषेत सांगायचं पण त्याचा उल्लेख हा मराठीत पण करा. जेणेकरून ते आपल्या अशिक्षित बांधापर्यंत जाईल .
आज आपली लोकशाही धोक्यात आहे. याचे गांभीर्य कोणाला असेल .. मनुवादी विचारसरणी सविधान बदलण्याच्या तयारीला केव्हाच लागलेली आहे आणि हे आपल्या बहुजन समाजाला दिसून येत नाही. याचे कारण असे आहे की बहुजन वर्गातील काही लोक राजकीय पक्षांमध्ये विभागले गेले आहे त्यामुळे राजकीय पार्टी जो आदेश देतील ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे काम आहे असे समजून घेतात. बहुजन वर्गाच्या विचाराला तेथे मुळीच थारा नसतो म्हणूनच आंबेडकरी पार्ट्या सोडल्या तर इतर बहुजन आपल्या वर्गाच्या विचारांची अंमलबजावणी ते मुळीच होऊ देणार नाही . परिणामी मनुवादी विचार ते संविधानामध्ये आपल्याला काय योग्य वाटते हा कायदा करून त्याची अंमलबजावणी करून घेतात .
म्हणजे असे झाले की सविधान म्हणजे एक घर आहे. त्या घरामध्ये काय बदल करायचा आहे . हे सर्व अधिकार यांच्याकडे आहे . कारण राज्यात आणि केंद्रात पण त्यांच्या विचारांची सरकार आहे. घर आपल्याला बाहेरून व्यवस्थित दिसते पण आतमध्ये डोकावून पाहिले तर नकाशा आपल्याला बदललेला दिसेल माझे सांगण्याचे तात्पर्य हे की रात्रच नाही तर दिवस पण वैऱ्याचा चालू आहे . बंधूंना लगेच सावध होण्याची गरज आहे . नाहीतर कमरेला झाडू आणि गळ्यात मडके यायला वेळच लागणार नाही . यामध्ये आपले नेते पैशासाठी किंवा पदासाठी लाचार होऊन त्यांच्याकडे जात असतील तर मनुस्मृतीची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही . यासाठी एक पर्याय आहे. एवढे आपल्या आंबेडकरी विचारांचे राजकीय पक्ष आहेत. त्यांनी आपले हेवेदावे , गर्वपण आणि मी पणा या काही त्यांच्या पोझिशन आहेत त्या सगळ्या सोडून देऊन त्यांनी समाजासाठी देशाच्या उद्धारासाठी एक होण्याचा निर्णय घ्यावा हे जर शक्य झाले तर आमदार , खासदार निवडून येण्यास वेळ लागणार नाही तरच बाबासाहेबांचे स्वप्न या देशाची शासनकर्ती जमात आपल्याला बनायचं आहे . हे सत्यात उतरताना आपल्याला दिसेल अशा पद्धतीचं वारं सुटलं तरच बाबासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपण ठरू !
जे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी आहेत त्यांना , आणि जे सुखसुविधा घेण्यापुरतेच बुद्ध आहेत अशा हिंदू महार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खूप खूप मंगल कामना.
जय भीम , जय संविधान
जय भारत
महेश देवशोध (राठोड)
वर्धा , जिल्हा प्रतिनिधी