भावनिक बनन्यापेक्षा बौद्धिक बना व विचार करा
भावनिक बनन्यापेक्षा बौद्धिक बना व विचार करा भारतात साधू ,भिक्कु ची पात्रता काय? यांचा पूर्व इतिहास काय? भिक्कु होण्यामागची भूमिका काय? खुप बुद्ध धम्माचे अध्ययन केले म्हणून भिक्कु झालेत वा यापूर्वी खूप कमी लोकांचे कल्याण केले व चिवर धारण करून हजारो लोकांचे कल्याण करण्यासाठी भिक्कु झालेत ? स्त्रियांच्या धार्मिक श्रद्धेचा हे कितपत फायदा घेतात याचाही विचार व्हायलाच हवा का? यांचा यापूर्वी रोजगार काय होता? प्रवजा कुणी दिली ,देणारा कितपत लायक आहे वा ग्रुप बनवून आर्थिक समस्या सोडविण्यासाठी भिक्कु होत आहेत का? विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होते काय? असेल तर बुध्द आणि त्यांचा धम्म ह्यात भिक्कु आणि उपासक ह्या नियमावलीत हे बसतात का? की केवळ अंधश्रद्धा विकसित करून पोट
भरणे हे उद्दिष्ट असेल तर इतर साधूत यांच्यात फरक काय? अश्याच प्रकारच्या भोंदू भिक्कुविरोधात
भद्रावती कोर्ट मध्ये तेरा वर्षे केस चालली त्यात आम्ही जिंकलो ते आता चिवर काडून काय करतात याचा शोध घ्या? सोबतच भद्रावतीचे विनायबोधी,घुगुसचे
विनायबोधीप्रिय ,
दिल्लीतील ज्ञानरत्न,तर नागपूरचे च्या एका भिक्कुचे
भिक्कुनीप्रति प्रेम व पुढे हत्या,चंद्रपूरच्या एका भिक्कुचा प्रताप बघा? सोसियल मीडियावर व्हायरल होणारा पियकळ भिक्कु हेही लोकांना सांगल्यास बरे होईल. यामुळे जनतेचा व पुढच्या पिडीच्या प्रगतीसाठी फायदा काय होईल? ह्याला
नवयानात स्थान आहे का? हीनयान वा महायान याचा वापर करून जनतेमध्ये अंधश्रद्धा विकसित करून स्वतःचे पोट भरण्यापलीकडे वेगळा उद्देश आहे का? यांचे पाय धुवून सेवा केल्याने नेमका कुठला फायदा होतो? धागे बांधणे, वंदना घेणे, परित्राण करणे एवढेच धम्माचे उद्देश होय काय? हे म्हणजे भिक्कु एवढे हुशार होते तर मोठे अधिकारी होऊन सेवा करण्यात हयांनी का रुची घेतली नाही? तसेही अति धार्मिक उन्माद मग तो कुठल्याही धर्माचा असो तो स्वतःच्या व देश प्रगतीस घातक असतो.श्रीलंका या देशात अर्थात अति धार्मिक उन्माद केल्यामुळे काय हाल झाले तेही बघा.पाकिस्तान व नेपाळ धार्मिक राष्ट्र आहे त्यांची काय स्थिती आहे? रोहींग्या मुसलमानाना कुणी कापले ?
आपला देश कायद्यावर चालतो तेव्हा अशा धार्मिक उन्मादाची आवश्यकता आहे का? यावर विचार जरूर करा.
जातीविहिन ,
वैज्ञानिक ,
समताधीष्टीत व तर्क विकसीत करणाऱ्या क्षमता विकसित करण्यासाठी कार्य व्हावे.आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण झाले असेल तर इतरांच्या मुलांनी प्रगत उच्च शिक्षण घ्यावे यासाठी कार्य केल्यास उपकार होतील.अतिधार्मिक व भावनिक बनण्यापेक्षा बौद्धिक बनण्याचा प्रयत्न केल्यास आपली व जनतेची सर्व दृष्टीने प्रगती होईल.
जयभीम
प्राचार्य डॉ.सत्यपाल कातकर,
मनोवैज्ञानिक तथा लेखक