हेडलाइन

परदेशी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे वतीने अभिनंदन !

Summary

ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी संख्येत १० वरून ५० इतकी वाढ करण्यात आली शासनाच्या या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आभार मानले आहे . तसेच या निर्णयामुळे लाभार्थी ठरलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. इमाव, विजाभज […]

ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी संख्येत १० वरून ५० इतकी वाढ करण्यात आली शासनाच्या या निर्णयाचे
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आभार मानले आहे . तसेच या निर्णयामुळे लाभार्थी ठरलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी संख्येत १० वरून ५० इतकी वाढ करण्यात आली आहे.

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी परदेशातील नामांकित शिक्षण विदयापीठामधील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मा. मंत्रीमंडळाच्या दि. २१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील १० व खुल्या प्रवर्गातील १० अशा गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत चा शासन निर्णय दि. ११/१०/२०१८ रोजी निर्गमित केला , परंतु प्रत्यक्षात मात्र त्यात संपूर्ण २० ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित केल्या गेल्याचे निदर्शनात आले . ओबीसी विद्यार्थ्यावर अन्याय झाल्याचे लक्षात येताच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांचे नेतृत्वात याविरोधात तत्काळ आंदोलन केले, त्या आंदोलनाचा परीणाम म्हणून १२/११/२०१८ ला शासन निर्णय निघून १० जागा इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गासाठी आरक्षित केल्या गेल्या.
विद्यार्थ्यांची बेताची आर्थिक परिस्थिती, पालकांकडे स्थावर जंगम मालमत्ता नसणे, बाजारात पत नसणे, पालक खेडूत व शेत मजूर आणि शिक्षित असणे या अशा विविध कारणासाठी, बँका इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विमाप्र प्रवर्गातील जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी कर्ज देत नाहीत. कारण बँकाकडून विद्यार्थ्यांना ठोस हमीची मागणी केली जाते. त्यामुळे प्रवर्गातील गरीब विद्यार्थी पात्रता, योग्यता व क्षमता असूनही परदेशातील उच्च शिक्षण, तंत्रज्ञान व संशोधनाच्या संधीपासून वंचित राहतात. महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील लोकसंख्याचे प्रमाण लक्षात घेता गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विदयार्थी संख्येत १० वरून ५० इतकी वाढ करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लाऊन धरली होती ,शासनाने याची दखल घेऊन मा. मंत्रीमंडळाच्या दि.२७.९.२०२२ रोजीच्या बैठकीत विद्यार्थी संख्या १० वरून ५० करण्याचा घेतला,
नुकताच शासनाने यासंदर्भात १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी शासन निर्णय जारी केला असून सन २०२२-२३ पासून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विदयार्थी संख्येत १० वरून ५० इतकी शाखानिहाय वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये अभियांत्रिकी / वास्तुकला शास्त्र १९, व्यवस्थापन १०, विज्ञान ६, कला ४, विधी अभ्यासक्रम ४, पीएचडी ३, वाणिज्य २, औषध निर्माण शास्त्र २, या प्रमाणे शाखानिहाय विभागून देण्यात आले आहे.
सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी १ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी विमान तिकिटासह एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी रु.३०.०० लाखाच्या मर्यादेत, तर पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी प्रतिविदयार्थी प्रतिवर्षी रु. ४०.०० लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रम निहाय संदर्भाधीन दि.११.१०.२०१८ व दि.१.२.२०२० च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
१३ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार जे इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहे. त्या सर्वांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव देवानंद कामडी, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, संघटक सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर,युवा अध्यक्ष राहुल मुन घाटे, उपाध्यक्ष राहुल भांडेकर, पंकज खोबे, सुरज डोईजड, महिला जिल्हाध्यक्ष संगीता नवघडे, महिला शहराध्यक्ष सोनाली पुण्यपवार, महिला संघटक सुधा चौधरी, ज्योती भोयर विभागीय उपाध्यक्ष भावना वानखेडे, किरण चौधरी, मंगला कारेकर आदींनी राज्य अभिनंदन केले आहे.

प्रा शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *