न्यायालयाच्या आदेशाची अवमानना दिघोरी पोलीस स्टेशन चा अफलातुन कारभार

लाखांदूर: तालुक्यात दोन पोलीस स्टेशन कार्यरत आहेत.आणि लाखांदूर तालुक्यातील अनेक नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होतो शासनाने पोलिस विभागाला वाळूचे ट्रॅक्टर पकडण्याचे अधिकार दिले त्या मुळे कोणत्या न कोणत्या कारणांमुळे दिघोरी पोलीस स्टेशन चर्चेत असते, असेच एक अवैध रेती वाहतुक प्रकरणी दिनांक ०८-१०-२०२३ रोजी सकाळ दरम्यान आर्थिक गुन्हे शाखा भंडारा, येथील किशोर हरिचंद मेश्राम व सचिन देशमुख यांनी रेतीची अवैध वाहतुक करतांना स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक MH 36 AG 3382 पकडुन पोलिस स्टेशन मध्ये जमा करून चालक रविंद्र केशव वाघाडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या विरुद्ध ट्रॅक्टर मालक गणेश सोनपिंपळे यांनी प्रथम दिवाणी न्यायालय लाखांदूर येथे वकिलामार्फत सुप्रुतनामा दाखल केले दिघोरी पोलीस स्टेशन व महसूल विभाग लाखांदूर यांचे म्हणणे होते कि, ट्रॅक्टर सोडायचे नाही आणि महसूल विभाग यांनी उत्तर सादर केले की आमचा दंड भरल्याशिवाय गाडी सोडण्यात येऊ नये मात्र न्यायालयाने ट्रॅक्टर व ट्रॉली, बाॅंड पेपरवर लिहून सुप्रूतनाम्यावर सोडण्याचे आदेश दिनांक १९-१०-२०२३ दिले
आदेशानुसार
ट्रॅक्टरचे मालक गणेश सोनपिंपळे हे दिनांक २०-१०-२०२३ रोजी सकाळ दरम्यान ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिस स्टेशन दिघोरी येथे गेले असता पोलिस विभागाने महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी यांना बोलावून नंतर फोटो काढून व पंचनामा तयार करू अशा शब्दात पोलीस हेमंत पवार बोलत असतात मात्र कोर्टाच्या आदेशात असे नमूद नाही कोर्टाच्या आदेशात फोटो काढणे व मोक्का पंचनामा सुकृत नामा तयार करून ट्रॅक्टर हा मालकाच्या स्वाधीन करण्यात यावा असे आदेश पारित केले आहे.
दिनांक २४-१०-२०२३ रोजी सायंकाळ दरम्यान सुचना पञ दिघोरी पोलीस स्टेशन चे मोहरर भोजराज भलावि यांनी घरी आनुन दिले आहे. सूचना पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केले की माननीय प्रथम दिवानी न्यायालय लाखांदूर यांचे आदेश क्रमांक ११७/२०२३ दिघोरी पोलीस स्टेशन येथे आणुन सादर केले आहे.
मात्र दिघोरी पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर आणण्यासाठी गेले असता वारंवार महसूल विभाग यांना तात्काळ बोलावले जातात.
भारतीय संविधान अनुच्छेद २० नुसार एका आरोपीला दोनदा शिक्षा नाही.
असा कायदा आहे.
मग दिघोरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार हे राज्यघटनेचा उल्लंघन करतात काय असा आरोप गणेश सोनपिंपळे करीत आहे.