BREAKING NEWS:
हेडलाइन

नागिणीचे पाण खाणे आरोग्यास बलवर्धक विड्याचे पान खाण्याने होतात हे फायदे

Summary

विडा खा विडाविडा म्हंटलं कि आपल्यासमोर येतो तो लवंग टोचलेला हिरवागार विडा. त्याचे दर्शन आजकाल विरळाच झाले आहे. आजकाल हा विडा आपल्याला लग्न कार्यात किंवा अगदीच कोणी हौसेनं धार्मिक कार्यानिमित्त ठेवलेल्या जेवणानंतर बघायला मिळतो . आपल्या सर्वांना माहीतच आहे कि […]

विडा खा विडाविडा म्हंटलं कि आपल्यासमोर येतो तो लवंग टोचलेला हिरवागार विडा. त्याचे दर्शन आजकाल विरळाच झाले आहे. आजकाल हा विडा आपल्याला लग्न कार्यात किंवा अगदीच कोणी हौसेनं धार्मिक कार्यानिमित्त ठेवलेल्या जेवणानंतर बघायला मिळतो . आपल्या सर्वांना माहीतच आहे कि पूर्वीच्या काळी प्रत्येक घराघरात विड्याचा चांदीचा किंवा पितळ्याचा डबा बघायला मिळायचा. पण तोच डबा आता बर्याच घरांमध्ये अँटिक पीस म्हणून दिवाणखान्याची शोभा वाढवताना दिसतो. आता विडे करणारे पूर्वीसारखेे कोणी हौशी कलाकार हि राहिले नाहीत. माझ्या आठवणीत, आमच्या गावात शेवगावात हैय्या शेठ सौदागर होते शौकीन आमच्या घरामध्ये असाच एक डबा होता. जेवणे झाली कि जेवढी माणसे असतील तेवढे विडे केले जायचे आणि ते एका चांदीच्या तारेमध्ये गजर्यासारखे गुंफले जायचे. मग एक एक जण हात धुऊन, त्यातला एक एक विडा घेत असे. विडा करण्याचे काम माझा काका करायचा. खास त्याच्या शैलीत, तो ती नागवेलीची हिरवीगार ताजी पाने स्वच्छ धुऊन एका कापडाने पुसून घ्यायचा आणि त्यांच्या शिरा आणि देठ काढून त्याला चुना, कात, वेलदोड्याचे २ दाणे, गुंजेचा पाला घालून घरी केलेली सुपारी, बडीशेप, गुलकंद, सुके किंवा ओले खोवलेले खोबरे, एखादी केशराची काडी असे सर्व जिन्नस घालून, त्याला द्रोणासारखे दुमडून, लवंग लावून सुंदर आणि सुबक विडे बनवायचा. आणि विडे घेणाऱ्या प्रत्येकाला आवर्जून सांगायचा कि विडा बकरीसारखा भराभरा खाऊन टाकू नका..शांतपणे चावून चावून मन लावून खा. मग जास्ती कोणाचं पान रंगतंय याची स्पर्धा लागायची. खासकरून मोठ्या लोकांमध्ये पान जास्ती किंवा कमी रंगण्यावरून फार चेष्टा मस्करी व्हायची. ज्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे पान जास्ती रंगायचे त्याच्या जोडीदाराचे प्रेम त्याच्यावर जास्ती, आणि ज्याचे कमी रंगायचे, त्याच्या जोडीदाराचे त्याच्यावर प्रेम कमी अशी चर्चा रंगायची…
विड्याचे पान म्हणजे विलास, व्यसन अशीही समजूत आहे. पण हे सगळे विचार सोडले तर त्याची उपयुक्तता फार महत्वाची आहे.. माझ्या आजीने किंवा माझ्या आई-वडिलांनी जे मला सांगितले ते मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल.
त्या आधी एक गोष्ट… समुद्रमंथनाच्या वेळेला जेव्हा धन्वंतरी अमृतकुंभ वर घेऊन आले तेव्हा मोहिनीच्या रूपात येऊन भगवान श्री विष्णूंनी त्या अमृताचे वाटप केले. पण त्यातील जे अमृत थोडे उरले ते त्यांनी एका ठिकाणी ठेवले, जिथून या नागवेलीचा उगम झाला. नागवेल सर सर नागाप्रमाणे वर वाढत गेली. तिची बदामाच्या आकाराची हिरवीगार लुसलुशीत पाने पाहून सर्व देवी देवता खुश झाले. सर्वांनी जेवणानंतर त्या पानांपासून बनलेल्या विड्याचा आस्वाद घेतला. त्या विड्याच्या अग्रभागी ब्रह्मा विष्णू महेश, श्री लक्ष्मी चा वास आहे. पण देठाला मात्र मृत्यू देवता आणि अलक्ष्मीचा वास आहे. त्यामुळेच पूजेला विडे मांडताना अथवा विड्याचे सेवन करताना त्याचे देठ काढून टाकायची पद्धत आहे. विड्या मुळे अनिष्ट शक्ती (bacteria & viruses)नाहीशा होतात. म्हणूनच त्याचे पूजेमध्ये महत्वाचे स्थान आहे.
आपण विड्याला थोडा चुना आणि कात लावतो. चुन्यामध्ये कॅल्शियम आहे आणि काती मधे अन्नपचन व्यवस्थित करण्याची क्षमता आहे. विड्याच्या पानामध्ये थोडा तिखट रस आहे ज्यामुळे जंतूंचा विनाश होतो. अपचन, कृमी, त्रिदोषांचे संतुलन करण्यासाठी विड्याच्या पानांचा उपयोग होतो.
हाता पायावर कुठे सूज आल्यास पानाचे कोटिस करून लावतात. त्याने सूज उतरायला मदत होते. तोंडाची दुर्गंधी, दातांचे आरोग्य राखण्यासाठी उत्तम मदत होते. मधुमेह, सर्दी पडसे, खोकला यावर फायदा होतो
बाळंतिणीला जेवणानंतर, मुद्दाम रोज घरी बनवलेले पान खायला देतात. बाळंतपणामुळे तिच्यातील शक्तीचा ऱ्हास झालेला असतो आणि पचनशक्ती सुद्धा मंदावलेली असते. अशावेळेस पान खाल्ल्याने फायदा होतो. पान खाताना, बाळंतिणीने बाळाला स्तनपान करण्यास घ्यावे. तिच्या मुखातील रस दुधाद्वारे बाळाच्या पोटात गेल्यास त्याचेही पचन चांगले होते. तिने तिच्या तोंडातील रस जर दूध पिताना बाळाचे ओठ ज्या ठिकाणी लागतात, त्या ठिकाणी लावला, तर तो रस बाळाच्या ओठाला लागल्यामुळे, त्याचे ओठ लाल चुटुक होण्यास मदत होते.
त्यामुळेच आपल्याला घरच्या घरी वर सांगितलेले पदार्थ घालून विडा करता येत असेल तर तो जरूर खा. काहीजण विडा कुटून तांबुलासारखा खातात. अतिशय चविष्ट लागतो. रोज नाही जमले तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा योग्य प्रमाणात आणि शास्त्रोक्त पद्धतीने, विडा करून खा. नक्की फायदा होईल.
आधार आयुर्वेद

सचिन सावंत
मंगळवेढा
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *