दर्जेदार शिक्षणासाठी आमूलाग्र बदलांची गरज: कला- क्रीडा -व कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणे गरजेचे २५हजार शाळा मुख्याध्यापकाविना आमदार ज. मो.अभ्यंकर
Summary
कोंढाळी- प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षक आमदार ज मो अभ्यंकर यांनी येथील लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाला भेटी दरम्यान […]
कोंढाळी- प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे
महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षक आमदार ज मो अभ्यंकर यांनी येथील लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाला भेटी दरम्यान सांगितले.
महाराष्ट्र राज्य मुंबई विभागीय शिक्षक आमदार अमरावती येथे शैक्षणिक कार्यक्रममाला जात असताना त्यांनी कोंढाळी येथील प्राथमिक शाळा व लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय येथे भेटी दिल्या. या भेटी दरम्यान जि प प्राथमिक शाळा कोंढाळीची पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या या नंतर येथील लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे भेटी दरम्यान शाळा परिसर निरिक्षणानंतर विद्यार्थ्यांबाबदआत्मियतेने विचारपुस केली .
यादरम्यान त्यांनी सांगितले की
शिक्षण क्षेत्रात मनुष्बळाची प्रचंड कमतरता आहे. खरे तर ज्या देशाची शिक्षणव्यवस्था श्रेष्ठ तो देश महान असतो. मात्र आपल्या देशात व राज्यातील तर चित्र उलटे आहे. १९९९मधे राज्यात शिक्षण विभागात २०लाख कर्मचारी होते, व राज्याचे बजट४०हजार कोटी चे होते, आणि २०हजार कोटी कर्मचार्यावर खर्च केला जात होता. २५वर्षा नंतर कर्मचारी संख्या आहे१३लाख ४३हजार व कर्मचाऱ्यांवर खर्च एक लाख ०६हजार करोड.
राज्यात सात लाख कर्मचारीर्यांची पदं रिक्त आहेत . मात्र सरकार म्हणते फक्त ६०हजारच पदं रिक्त आहेत.
*२५हजार शाळा बिगर मुख्याध्यापक*
राज्यात सात लाख कर्मचारी संख्या कमी असतांनाच राज्यात २५हजारशाळांना मुख्याध्यापक चे नाही. अर्थात डोक्या शिवाय शरिर असी प्रचंड दुरावस्था शिक्षण क्षेत्रातील आहे.
*के.कस्तूरीरंजन समिती*
चा उल्लेख करत सांगितले की फिनलॅंड या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर आधारित नविन शिक्षण धोरण आखले पाहिजे ,ज्यात कला क्रीडा व कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. मात्र सरकार कडून संगीत (कला)व क्रीडा या शिक्षकांचे पदं रद्द केले आहे.नविन भरतीला स्थगिती आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये चार शिक्षकांऐवजी एक शिक्षक शिकवत आहे अशी शिक्षणाची दुरावस्थाआहे. यावर शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेचे विविध आयुधांचा वापर करून शिक्षण क्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसेच
आमदार अभ्यंकर म्हणाले, की राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला दिशा देण्यासाठी त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून तणावमुक्त शिक्षण दिले पाहिजे. पायाभूत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे त्यासाठी कृतीयुक्त शिक्षण द्यावे. व्यवसायाभिमुख, कौशल्याधिष्ठित, तांत्रिक शिक्षण देण्यावर भर द्यावा. शैक्षणिक प्रक्रीयेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण विभागाने सतत प्रयत्नशील रहावे.
असे मत शिक्षक आमदार ज मो अभ्यंकर यांनी लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयत शिक्षक वर्गाकडून झालेल्या सत्कार प्रसंगी सांगितले. या प्रसंगी आमदार अभ्यंकर यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण ही करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य सुधीर बुटे उपप्राचार्य कैलास थुल, परिक्षा प्रमुख सुनिल सोलव, संजय आगरकर,बागायत प्रमुख शाम धिरण, कुसुम वरठी शिवाजी जामदार, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सचीव राऊत, तुषार अंजनकर दिलीप चौके गुरूदास कठाणे यादव पंधराम शुभम राऊत प्रकाश मलवे हरि राऊत तथा अन्य पदाधिकारी उपस्थित होते.