डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवराष्ट्र निर्मितीचे भाग्यविधाता
- ▪ डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर नवराष्ट्र निर्मितीचे
भाग्यविधाते▪
▪ महापरिनिर्वाण दिनानिमित्त
विशेष▪
▫️ महेश देवशोध▫️
🔹 पोलीस योद्धा वृत्त सेवा🔹
🔹 वर्धा , जिल्हा प्रतिनिधी🔹
🔹 महेश देवशोध ( राठोड )🔹
▫️ केवळ दलित उद्धाराचा नव्हे तर समग्र मानव मुक्तीचा लढा हेच आपले जीवन उद्दिष्ट म्हणून अत्यंत समर्पित जीवन जगलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या समाजावरील प्रेम फार मोठे आहे गरीब, वंचित, उपेक्षित आणि दलित समाज बांधवांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांनी आपली सारी बुद्धी, शक्ती ,आपले कर्तृत्व पणाला लावले . त्यांच्या या साध्या कर्तृत्वावर विलक्षण बुद्धिमत्ता , सखोल गंभीर चिंतन, अध्ययन , विवेकपूर्ण कर्तव्य आणि कट्टर देशनिष्ठा यांचे भक्कम अधिष्ठान होते. म्हणूनच त्यांनी आपल्या कार्यकाळातील देशासमोरच्या सर्व महत्त्वपूर्ण समस्या आणि विद्याचे प्रश्न अध्ययन केले आणि त्यावरील उपायांच्या बाबतीत ही सुस्पष्ट नेमकी आणि देशहिताची भूमिका मांडणारे प्रतिपादन लेखनही केले, जगभरातील विचार विश्वाला पक्के करून सोडणारा त्यांच्या बुद्धीचा आवाका त्यांच्या वागण्यातून व त्यांच्या कार्यातून प्रत्ययाला येतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन भारतीय प्रजा स्थितीचे अवलोकन करून या देशाला अत्यंत स्पष्टपणाने नवराष्ट्र निर्मितीचा राजकीय व सामाजिक कार्यक्रम दिला आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी जिवाचे रान केले. हे त्यांचे भारतीय स्वातंत्र्याला दिलेले बहुमूल्य योगदान आहे म्हणून बाबासाहेबांच्या उल्लेख भारताचे राष्ट्र निर्मितीचे भाग्यविधाते म्हणून करता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते तर या देशातील अखिल बहुजन समाजाची काळजी वाहणारा ते एक महान राष्ट्रवादी नेते होते. विचारांनी लढा देण्याचे संस्कार देणारे नेते म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख करावा लागेल. *** मी प्रथम भारतीय *** नंतर भारतीय आणि शेवटी ही ***भारतीय असा आपल्या भारतीयत्वाचा सार्थ अभिमान बाळगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर भारतीय भारतीयत्वाचे मूर्तिमंत प्रतीक होते. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व मुळी बहुआयामी स्वरूपाचे होते. त्यांच्या विविधांगी पैलूंचा वेध घेणे हे त्यामुळेच आव्हानात्मक बनले आहे .विविध विषयामध्ये संशोधन आणि अभ्यासपूर्ण व्यासंगी प्रतिपादन हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष होता. बाबासाहेब हे केवळ तुमच्या माझ्या दृष्टीने मोठे आहेत असे नव्हे तर जागतिक परीक्षनातून त्यांच्याकडे पहिले असतानाही त्यांचे मोठेपण व्यापुन उरते. ते केवळ दलितांचे मुक्तिदाते होते असे म्हणून त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही . या देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या संकुचित बंदिस्त मानसिकतेतून मुक्त करण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम केले. देशातील स्त्रियांना ज्याप्रमाणे आत्मभान, आत्मसन्मान देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या देशातील पुरुषांचीही बंदिस्त पुष्टी बंदिस्त पुरुषी मानसिकतेतून मुक्तता करण्याचे त्यांनी केलेले कार्य ही दुर्लक्षिता न येणारे आहे. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता आणि देशनिष्ठा याबद्दल महात्मा गांधी, पंडित नेहरू व वल्लभभाई पटेल किंवा त्यांच्या समकालीन नेतृत्वामध्ये तीळमात्रही संशय नव्हता म्हणूनच नेहरूंच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्याची शिफारस खूद गांधीजींनी केली तसा संदेह असता तर मसुदा समिती मध्ये ही त्यांचा समावेश होऊ शकला नसता. तथापि आदर्श राज्यव्यवस्थेची मार्गदर्शक तत्वे निर्माण करून स्वतंत्र भारताच्या पुढील वाटचालीची दिशा नक्की करण्याची क्षमता प्राप्त आंबेडकर यांच्यात असल्याची जाग व भान तत्कालीन नेतृत्वाला होती. घटना निर्मितीचे त्यांचे कार्य आणि योगदान हे भारतीय समाजावरील त्यांचे थोर उपकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उदय ह्या साऊथबरो कमिशन समोरील त्यांच्या साक्षीने झाला. कमिशन समोर जात , धर्म, शिक्षण, भाषा, जमीन मालक मालकी, कशी कुणाची अशी कोणतीही अट न घालता विनाअट मतदानाची मागणी करत या देशातल्या मतदानापासून वंचित असणाऱ्या सुमारे 85 टक्के बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व जणू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आणि ही मागणी ब्रिटिशांनी मान्य करण्याची खूपच अंधुक शक्यता दिसत असल्याने ते शक्य नसेल तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांनी लावून धरली होती.
जातीभेदाचे अनेक चटके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लहानपणापासूनच सोसले होते. धर्म मूढानी केलेला आपला अपमान यांनी धर्म , धर्मग्रंथ, पुरोहित कर्मकांडं , पूर्वजन्म, पुनर्जन्म , ईश्वर, दैववाद ह्या वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था ना चिरंजीव करणाऱ्या मुळावर त्यांनी घाव घातले माणूस विज्ञाननिष्ठ व्हावा आधुनिक मुल्यांचे त्यांना भान व्हावे त्यांच्या हक्काची , माणुसकीची , अस्मितेची त्याला जाणीव व्हावी शब्द प्रामाण्य , ग्रंथप्रामाण्य यातून मुक्त होऊन तो निर्भय बनावा ह्या व्यापक उद्दिष्ट बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व लढे केंद्रीभूत झालेले असल्याचे आपल्याला दिसून येईल त्यांचा उदारमतवाद आपल्याला समन्वय शिकवतो , तडजोड शिकवितो आयुष्यभर त्यांनी केलेल्या सामाजिक लढाईची दिशा त्यांच्या जगप्रसिद्ध,**** शिका ****संघटित व्हा ****आणि ****संघर्ष करा या संदेशात एकवटलेली आहे .इथल्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विषमतेची मुळे वरवरच्या मोजपट्टीने नष्ट करून टाकता येणार नाही. हे आंबेडकरांनी ओळखले होते म्हणून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची कृतिशील लढाई केली. जातिनिर्मूलन या ग्रंथात त्यांनी केलेली मांडणी स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा स्टेटस मधील विशेष विशेषण आणि लोकशाही शासन प्रणाली चा पुरस्कार करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे लेखन यातून त्यांचे क्रांतिकारक तत्त्व सिद्ध होते. म्हणूनच बाबासाहेब हे भारतातील संम्यक क्रांतीचे निर्विवाद नेते आहेत ही बाब स्पष्ट होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील नगण्य , सामान्य , शोषित ,पीडित, आदिवासी, भटके-विमुक्त ,जनआणि स्त्रिया जे सर्व ह्या महान देशाच्या स्वातंत्र्याची सारखेच वाटेकरी क आहे.**** त्या प्रत्येकाला एक मत**** एक मूल्य हा मूलभूत अधिकार त्यांनी प्रदान केला. घटनेच्यासरनाम्यात त्याची नोंद केली. ही बाबासाहेबांची कामगिरी अभूतपूर्व ठरली केवळ अस्पृश्यता निर्मूलन संविधान निर्मिती एवढाच मर्यादित योगदान बाबासाहेबांनी दिलेली आहे असे नाही तर त्याही पलिकडे या देशाचे वा इस्राईलच्या प्रतिनिधी मंडळातील मजूर मंत्री म्हणून त्यांनी या देशातील कामगार वर्गाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची दखल या ठिकाणी घेतली गेली पाहिजे त्या काळात कोळसा खाणीचे महत्व तेजीत होते त्याचप्रमाणे विज्ञानाच्या क्षेत्रात लागत असलेल्या क्रांतिकारक शोधामुळे अभ्रका च्या खानीनाही महत्त्व आले होते. त्यातही जगातील अंशी टक्के अवधी अभ्रकाचे उत्पादन एकटा भारत करीत होता यावरून या बाबींचे महत्त्व लक्षात येते.
एकंदरीत देशापुढील एकही प्रश्न असा नाही की ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही .ते सक्रिय बुद्धीमंत विचारवंत होते व त्यांचे विचार आजच्या संदर्भात इतकेच लागू होतात म्हणून अश्या विश्व मानवतेचा विचार करणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना माझे विनम्र अभिवादन.