चिकना येथील सभा मंडपाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ग्रा. पं. चिकना चा भोंगळ कारभार आथिर्क लालसेपोटी गोरकधंधा

दिघोरी :- लाखांदूर तालुक्यातील चिकना येथे स्थानिक आमदार निधीतून सहा लक्ष रुपये किंमतीचे सभागृहाचे बांधकाम सुरु आहे. हे काम अत्यंत निकृष्ट साहित्याचा वापर करून तयार करण्यात येत असून सदर कामाची उच्चस्थरीय चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चिकना येथे मागिल पंधरा दिवसापासून सभागृहाचे बांधकाम सुरु आहे. हे काम स्थानिक आमदार यांच्या निधीतून अंदाजे सहा लक्ष रुपये किंमतीचे मंजूर करण्यात आले. हे काम ग्रामपंचायत चीकना यांच्या नावे आहे. मात्र ग्रामपंचायतने आर्थिक लालसेपोटी हे काम कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेल्या ठेकेदाराला दिले आहे.हे काम करीत असतांना संबंधित ठेकेदाराने अंदाजपत्रकाला बाजूला सारून हे काम मनमर्जीने सुरु केले आहे. बांधकामातील मुख्य घटक सिमेंट, लोहा याचा अल्पप्रमाणात वापर केला असून कच्या व पक्क्या अशा दोन प्रकारच्या विटाचा बांधकामात वापर केला आहे. सदर कामावर अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करण्यात येत असल्याने जुळाई केल्या विटातील सिमेंट सहज रित्या निघत आहे. अधिक फायदा कमविन्याच्या उद्देशाने ठेकेदार हे काम करीत असून व आर्थिक लालसेपोटी ग्रामपंचायत या बांधकामाकडे लक्ष देत नसल्याने अंत्यत निकृष्ट साहित्याचा वापर करून ठेकेदार हे काम करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर कामावर देखरेख अभियंतासुद्धा येत नसल्याने चांगलेच फावले आहे. संबंधित बांधकामाची उच्चस्थरीय चौकशी केल्यास सर्व घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारल्या जाऊ शकत नाही. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.