भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसाठी ३४ कोटी निधी मंजूर – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम • जिल्हा नियोजन आढावा बैठक • निधी वेळेत खर्च करा

Summary

भंडारा, दि. ८ :- भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य तज्ञाची समिती तयार करून या समितीच्या सल्ल्यानुसार आरोग्य सुविधा वाढविण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. आरोग्य सुविधांचे क्षमता वर्धन करण्यासाठी आज […]

????????????????????????????????????

भंडारा, दि. ८ :- भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य तज्ञाची समिती तयार करून या समितीच्या सल्ल्यानुसार आरोग्य सुविधा वाढविण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. आरोग्य सुविधांचे क्षमता वर्धन करण्यासाठी आज जिल्हा नियोजन समितीने 34 कोटी 24 लाख रुपये निधीला मान्यता दिली आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. यापुढील काळातही जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनात जिल्हा नियोजन समितीचा अत्यंत महत्वाचा वाटा असून विकासाचे नियोजन करतांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच विकास कामे व निधी खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यंत्रणांना वितरित करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

 खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे, आमदार नाना पटोले, आमदार नागो गाणार, डॉ. परिणय फुके, ॲड. अभिजित वंजारी, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सर्वसाधारण योजनेकरिता सन 2020-21 अंतर्गत एकुण मंजुर निवतव्यय रुपये 12914.00 लक्ष असून यापैकी माहे मार्च, 2021 पर्यंत मंजूर असलेला संपूर्ण नियतव्यय रुपये 12914.00 लक्ष संगणकीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर शासनाकडून प्राप्त झालेला आहे. त्यापैकी रुपये 12882.03 लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून कार्यवाही यंत्रणांनी माहे मार्च, 2021 अखेर रुपये 12445.43 लक्ष खर्च नोंदविलेला आहे. वितरीत तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 96.61 एवढी आहे.

  अनुसुचित जाती उपयोजनेकरिता सन 2020-21 अंतर्गत एकुण मंजुर नियतव्यय रुपये 5056.00 लक्ष असून माहे मार्च,2021 पर्यंत सदर संपुर्ण निधी रुपये 5056.00 लक्ष शासनाकडून प्राप्त झालेला आहे. यापैकी रुपये 5050.48 लक्ष निधी यंत्रणांना वितरीत करण्यात आला असून कार्यवाही यंत्रणांनी माहे मार्च, 2021 अखेर रुपये 5050.47 लक्ष खर्च नोंदविलेला आहे. वितरीत तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 99.89 टक्के एवढी आहे.

आदिवासी उपयोजना क्षेत्र बाह्य करिता सन 2020-21 अंतर्गत एकुण मंजूर नियतव्यय रुपये 949.63 लक्ष असून माहे मार्च, 2021 पर्यंत मंजुर असलेला संपुर्ण निधी रुपये 949.63 लक्ष संगणकीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर शासनाकडून प्राप्त झालेला आहे. यापैकी रुपये 947.15 लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून कार्यवाही यंत्रणांनी माहे मार्च, 2021 अखेर रुपये 946.82 लक्ष खर्च नोंदविलेला आहे. वितरीत तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 99.97 एवढी आहे. उपरोक्त खर्चास आजच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2021-22 अंतर्गत या आर्थिक वर्षात मंजूर नियतव्ययापैकी 30 टक्के निधी इतर जिल्हा योजना या योजनेंतर्गत फक्त कोविड 19 च्या प्रादुर्भावाशी संबंधित सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधांच्या बळकटीकरणासाठी वर्ग करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.

कोविड 19 प्रादुर्भावावरील उपाययोजना करण्याकरिता जिल्ह्यात जुलै अखेर 34 कोटी 24 लाख 5 हजार रुपयाच्या कामांना मान्यता प्रदान करण्यात आली असून त्यावर रुपये 9 कोटी 14 लाख 67 हजार निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सदर निधी हा शासनाने मंजूर नियतव्ययापैकी 30 टक्के मर्यादेत निधीचा कपात करावयाची असून कोविड करिता उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. याबाबत महसूली क्षेत्र ओ-66 अंतर्गत करावयाचे रुपये 35 कोटी निधी पुनर्विनियोजन प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2020-21 अंतर्गत कार्यान्विती यंत्रणांकडून इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण, यात्रा स्थळांचा विकास ईत्यादी महत्वाचे योजनांसह विविध 23 योजनांचे 27 कोटी 48 लक्ष 52 हजार किंमतीचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले. तसेच नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत रुपये 11 कोटी 3 लाख 23 हजार किंमतीच्या 18 योजना समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला. यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच बेनाबाई देवस्थान कुर्झा ता. पवनी या स्थळाला ‘क’ वर्ग तिर्थक्षेष घोषित करण्याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी शिफारस करण्यात आली.

या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. 25 जानेवारी 2021 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे इतिवृत्तास मान्यता प्रदान करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मार्च 2021 अखेर झालेल्या खर्चास मंजुरी प्रदान करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना 2021-22 जुलै 2021 पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा. कोविड -19 उपाय योजनेंतर्गत लागणारा निधी करिता पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना 2021-22 अंतर्गत विविध योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्यात आली. यासह या बैठकीत जिल्हा विकासाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव आमदार अभिजित वंजारी यांनी मांडला. या प्रस्तावाला सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन दिले. जिल्ह्यातील अधिकारी, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे भंडारा जिल्हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा ठरला. याबद्दल सभागृहाने अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *