कोंढाळी ला.भु विद्यालयात पोहचली अंतरिक्ष महायात्रा हजारो विद्यार्थांनी पाहिले अंतराळ

वार्ताहर कोंढाळी :-दुर्गाप्रसाद पांडे
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), शिक्षण विभाग, विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ आणि लाखोटीया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व सी बी एस ई हायस्कूलच्या संयुक विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा प्रदर्शनी बस शुक्रवारी ०८मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रांगणात पोहचली. हजारो विद्यार्थांनी ही प्रदर्शनी पाहून इस्त्रोची कार्यपद्धती समजावून घेतली.
प्रदर्शनीचे उद्घाटन सकाळी ९-३० वाजता नागपूर जिल्हा शिक्षण अधीक्षक(माध्यमिक) जयेश वाकोडकर यांच्याहस्ते झाले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर बुटे, संस्थेच्या उपाध्यक्षा रेखाताई राठी, ब्लाक शिक्षण अधिकारी नरेश भोयर,शिक्षण विस्तार अधिकारी बोढारे, शिक्षण केंद्र प्रमुख निळकंठराव लोहकरे, संस्था संचालक संजय राठी, उप प्राचार्य कैलास थुल, सी बी एस ई चे प्राचार्य योगेश चौधरी प्रशासकिय अधिकारी अशोक कष्टी, पर्यवेक्षक मनोज ढाले,हरिष राठी, रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉ प्रशांत राठी डा सौरभ सांगाणी यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित होते. स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञान सार्वत्रिक व्हावे या हेतूने इस्त्रोची ही फिरती प्रदर्शनी विद्यार्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रसंगी शिक्षण अधिक्षक जयेश वाकोडकर, बी ई ओ नरेश भोयर, प्राचार्य सुधीर बुटे, विस्तार अधिकारी बोढारे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक शाळेतून वैज्ञानिक घडला पाहिजे ही या अंतरिक्ष महायात्रा बस चे नियोजनाबाबत चार उद्देश आहे असे जिल्हा शिक्षण अधीक्षक जयेश वाकोडकर यांनी सांगितले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रांगणात पोहचलेली ही प्रदर्शनी जवळपास २५ शाळांच्या हजारो विद्यार्थांनी व त्यांच्या शिक्षकांनी पाहिली. अतंराळ संशोधन संस्थेचे काम समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थांनी केला. अंतराळ विज्ञान, त्यातील संशोधन, भारताने अंतराळात आतापर्यंत केलेले विविध विश्वविक्रम, अंतराळ संशोधनातील संधी अशा विविध विषयावर या प्रदर्शनीतून माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या फिरत्या अंतराळ वाहनाचे निरीक्षण केले. अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थित शास्त्रज्ञांना कुतूहलाने प्रश्न विचारले. समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. सांयकाळी पाच वाजेपर्यंत ही बस महाविद्यालयाच्या प्रांगणात होती.
या प्रसंगी विद्यार्थ्यींनी इस्रो संस्थेचे उपक्रमांना सांस्कृतिक , शैक्षणिक सह रांगोळी, भिंती चित्र, व देखाव्यांचे माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.त्याप्रदर्शनी चे उद्घाटन ही शिक्षण विभागाचे अधिक्षक ,बी ई ओ, संस्था उपाध्यक्ष, संचालक, तथा प्रमुख पाहुणे मंडळी द्वारा करण्यात आले.
या प्रसंगी गुणवंतांचे गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यांचा संस्थे मार्फत सत्कार करण्यात आला. या आयोजनाचे सफलतार्थ
लाखोटीया भुतडा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व सी बी एस ई चे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
संचलन रूपेश वादाफळे तर आभार प्रदर्शन प्रर्यवेक्षक मनोज ढाले यांनी केले.