नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी मधे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

Summary

कोंढाळी-वार्ताहर (दुर्गा प्रसाद पांडे) ११ एप्रिल हा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंतीदिन. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यावर्षी ग्रामपंचायत कोंढाळी येथील सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना […]

कोंढाळी-वार्ताहर
(दुर्गा प्रसाद पांडे)
११ एप्रिल हा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंतीदिन. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यावर्षी ग्रामपंचायत कोंढाळी येथील सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले. आजच्या आधुनिक विचारांच्या साक्षर समाज निर्मितीमध्ये त्यांचे अमुल्य योगदान आहे. असे मत सरपंच केशवराव धुर्वे यांनी व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला असुन या अंतर्गत शिक्षण विभागाच्या समन्वयाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मी सावित्रीबाई बालते किंवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयांवर एकांकिका स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येतील अशी माहिती उपसरपंच स्वप्निल व्यास यांनी या प्रसंगी दिली. या प्रसंगी ग्रामपंचायत चे सदस्य, ग्रामविकास अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आर बी व्यास महाविद्यालयात ही महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.या वेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ राजु खरडे तर प्रमुख वक्ते संस्था अध्यक्ष विरेंद्र सिंह व्यास यांनी महापुरुष,महानायक,महामानव,यांच्या जयंत्या, पुण्यतिथी आयोजन करून त्यांच्या विचारांना वैचारिकरीत्या उजाळा दिला जातो. अशी भूमिका पाहूण्यांनी मांडली.मान्यवरांचे हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. सोबतच येथील
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय-,जि प प्राथमिक शाळा, लाखोटीया भुतडा हायस्कूल,कनिष्ठ महाविद्यालय व सी बी एस ई हायस्कूल, येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *