नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळीत २४-२५-२६जानेवारी रोजी संस्कृतीक कलाउत्सवाची रेल चेल लाखोटिया भुतडा‌ शिक्षण समूह, जिल्हा परिषद शाळा, त्रिमुर्ती हायस्कूल, अरविंद इंडो हायस्कूल यांच्या कडून तीन दिवसीय सांस्कृतिक मेजवानी स्नेहसंमेलन रंगले

Summary

कोंढाळी (प्रतिनिधी)/ येथील सी पी अन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी कोंढाळी च्या लाखोटीया ‌भुतडा कनिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, सी बी एस ई हायस्कूल, तसेच लोणकर राठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय संयुक्त स्नेहसंमेलनां सह येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक, त्रिमुर्ती हायस्कूल […]

कोंढाळी (प्रतिनिधी)/
येथील सी पी अन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी कोंढाळी च्या लाखोटीया ‌भुतडा कनिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, सी बी एस ई हायस्कूल, तसेच लोणकर राठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय संयुक्त स्नेहसंमेलनां सह येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक, त्रिमुर्ती हायस्कूल दुधाळा तसेच अरविंद इंडो हायस्कूल यांच्या कडून २६जनेवारी लाविद्यार्थी,पालक,
शिक्षक आणि कोंढाळी तसेच लगतचे गावकऱ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे मेजवानीसह तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचा यशस्वी समारोप झाला.

लाखोटीया भुतडा शिक्षण समूहाच्या या तीन दिवसीय विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे पहिल्या दिवशी काटोल चे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या समारंभाच्या अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ संपादक प्रमोद काळबांडे, शिक्षण विभागाचे जि प‌ शिक्षण अधिक्षक व‌ उपशिक्षणाधिकारी डॉ जयेश वाकोडकर, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम चे प्राचार्य डॉ देवेंद्र भोंगाडे, काटोल चे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम, काटोल तालुका शिक्षणाधिकारी जावेद ईकबाल,संस्थेचे सचीव डॉ शामसुंदर लद्धड, उपाध्यक्ष रेखा राठी, संचालक राहुल लधद्ध,संजय राठी, लाखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर बुटे,सी बी एस ई हायस्कूल चे प्राचार्य आशुतोष केदार पवार, लोणकर राठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार ही
२४-२५-२६जानेवारी रोजी संस्थेच्या तिन्ही शाखेच्या संयुक्त स्नेहसंमेलना दरम्यान कनिष्ठ महाविद्यालय व हायस्कूल चे प्राचार्य सुधीर बुटे, सी बी एस ई हायस्कूल प्राचार्य आशुतोष केदार पवार यांनी अहवाल वाचन केले. या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम चे मेजवानी चे दरम्यान विज्ञान प्रदर्शनी, रांगोळी,चित्रकला स्पर्धा, त्याच प्रमाणे चारा ही शिक्षण समूहाच्या चे विद्यार्थ्यांचे वतीने देशातील बहूदा
सर्वच प्रदेशातील लोकनृत्य, पर्यावरण, अंधश्रद्धा , शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धीर देण्याचा साठी प्रतिकात्मक विठ्ठलांनी केलेले भावनिक आवाहन, कुटूंबियांना जेष्ठ नागरिकांची देखभाल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज झांसी ची राणी, पासून अनेक राज्यांचे लोकनृत्य, धार्मिक, सांस्कृतिक नृत्य व गीतावर आधारीत ५६-५७ सांस्कृतिक महोत्सवाचे प्रस्तुती केली.
या प्रसंगी शिक्षण समूहाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय,राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून आयोजित खासदार चषकात अनेक खेळात अव्वल स्थानावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचे तसेच दहावी बारावी वर्गात परिक्षेत्र अव्वल स्थानावर आलेले विद्यार्थ्यांचे गुण गौरव करण्यात आला. आर बी व्यास महाविद्यालय चे संचालक स्वप्निल व्यास, कोंढाळी कला, ‌वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे सचीव समीर ठवळे, माजी सभापती शेषराव चाफले माजी जि प‌ सदस्य पुष्पाताई चाफले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष हरिष देशमुख,डॉ ‌धारपूरे,प्रा. देविदास कठाणे,बाल किसन पालीवाल, किशोर गाढवे, विनायक मानकर मारोतराव बोरकर, योगेश चाफले,शामराव तायवाडे, निखील जयस्वाल, बंडू डबली, दुर्गा प्रसाद पांडे, दामोदर कुहिटे, भास्करराव पराड, विशाल काळबांडे, प्रमोद चाफले , आकाश जैन, उप प्रचार्य योगेश चौधरी, वरिष्ठ पर्यवेक्षक मनोज ढाले, हरिष राठी, खेळ प्रशिक्षक, हजारो महिला पुरूष पालक, माजी विद्यार्थी,आजी माजी सरपंच, उपसरपंच, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी
तसेच शिक्षकेतर कर्मचारी
उपस्थित होते. कार्यक्रम चे संचालन सुनिल सोलव, यशोदा नासरे तर आभार प्रदर्शन उप प्राचार्य कैलास थुल यांनी केले.

त्रिमुर्ती हायस्कूल दुधाळा
दुधाळा येथील त्रिमुर्ती हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील लोकसंस्कृती, लोकगीते, छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा, मलखांब, बंजारा संस्कृतीची झलक दाखवली,
निजामियां हायस्कूल कोंढाळी येथील स्नेहसंमेलना अंतर्गत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढाळी या शाळेच्या कॉन्व्हेन्ट, पहिली ते पाचवी ते सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान, रांगोळी, तसेच जवळ जवळ २५प्रकारचे नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुटाफळे यांचे अध्यक्षतेखाली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच उपसरपंच व सर्व माजी ग्रा प सदस्यांचे उपस्थीत सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कारांची लय लूट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *