केंद्र सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन ७ वर्षात सर्वच आघाडयावर केंद्र सरकार अपयशी- डॉ . किरसान
गोंदिया :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ३० मे.
—————————————-
आज ३० मे ला केंद्रातील मोदी शासनास ७ वर्ष पूर्ण झाले आहेत . मोदी सरकारच्या या ७ वर्षाच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. अर्थव्यवस्था, कोरोना महामारीशी लढ़ा, वाढती माहगाई, सतत वाढणारे डिजेल पेट्रोलचे दर, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आंदोलन अशा सर्व आघाडयावर केंद्र सरकार अपयशी ठरलेलं आहे . यांचा निषेध म्हणुन आज ३० मे ला गोंदिया जिल्हा काँग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था तळाला गेलेली आहे. बंगलादेशा पेक्षा भारताची जी.डी.पी. कमी झालेली आहे. व प्रतिव्यक्ती वर्षीक उत्पनात आपला देश बंगलादेशापेक्षा ही मागे लोटला गेलेला आहे. आज कोरोना महामारीच्या काळात ज्या देशांना आपण मदत करायला पाहिजे ते केनिया, भुटान सारखे छोटे देश आपल्या देशाला मदत करीत आहेत. या स्थीतीवर देशाला नेण्याचे काम केंद्रातील मोदी सरकाने केलेले आहे. नोटबंदी व चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेला जी.एस.टी. मुळे देशाची अर्थ व्यवस्था ढासळली. गतवर्षी अचानाक आगाऊ कल्पना न देता लावण्यात आलेल्या राष्ट्रीय तालाबंदीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. प्रवासी मजुरांचे अतोनात हाल झाले. केंद्र सरकारने तालाबंदी आधी त्यांची जाण्याची व्यवस्था ने केल्यामुळे त्यांना ५०० ते १००० कि.मी. पाई चालत जावे लागले. या प्रवासात अनेकांना जीव गमवावा लागला. कोविड साथ रोगाच्या नियंत्रणत सरकारने गाफीलपणा केला. दुसऱ्या लाटेबद्दल शास्त्रज्ञानी दिलेल्या सुचनांची अवहेलना करुन स्वत: प्रधानमंत्री, गृहमंत्री व केंद्रातील मंत्रीमडंळ पाच राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त राहिले, देशात हाहाकार माजला असतांना, ऑक्सीजनची कमतरते मुळे लोक मृत्यू पावत असतांना, रुग्णालयाची कमतरता व बेडस् ची अनुपलब्धता मुळे होणारा कोरोना रुग्णांचा मृत्यू , स्मशानात अंतिम संस्कार साठी लागलेल्या रांगा, सतत जळणाऱ्या चिता या सर्व माध्यमांव्दारे दृष्टीगोचर होत असतांना सुध्दा प्रधानमंत्री बंगालची निवडणुक प्रतिष्ठेची करुन त्या ठिकाणी कोविडचे नियम धाब्यावर बसऊन रॅली व रोड शो करुन, गर्दी पाहून आनंदी होण्यातच वेळ घालवला व महामारीने यातना सहन करणाऱ्या नागरीकांकडे दुर्लक्ष केले. त्यामुहे मृतांचा आकडा सतत वाढत गेला. लसीकरणामध्ये दिरगांई व असुसुत्रता, राज्यांवर लसीकरणाची जबाबदारी टाकणे, केंद्राने संपूर्ण देशभर मोफत लसीकरण करणे गरजेचे असतांना ती जबाबदारी राज्यांवर सोपवणे, लसींचे केंद्रासाठी वेगळे व राज्यांसाठी जास्त दर ठरवणे, आगाऊ लसीची बुकींग न करने, लस संशोधनासाठी फंड उपलब्ध न करने, दुसऱ्या लाटेबद्दल चेतावनी दिली असतांना सुध्दा फेब्रुवारी मध्ये प्रधानमंत्री आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरणाशिवाय कोरोनावर मात केल्याची घोषणा करणे, वृत्त पत्राच्या व इतरमाध्यमांच्या हेडलाईन मॅनेजमेंट करने, लसीचा पुरेपुर साठा नसतांना टिका उत्सव साजरा करण्यास लावणे १८ वर्षवरील युवकांना लसीकरण जाहीर करण्यांत घाई करणे इत्यादिमुळे कोरोनाचे संकट रोखण्यात सरकार अपयशी ठरले. महागाईत भरमसाठ वाढ ही चितेची बाब आहे. परंतु केंद्र सरकारला याची चिंता वाटतांना दिसत नाही . डिझेल ९ ० रु. व पेट्रोल १०० रु. प्रतिलिटर वर गेलेला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती, ४१० रुपया वरुन ९ ०० रुपये करण्यात आल्या. तसेच गोडे तेलाचे भाव २०० रु. वर गेले. सर्वच वस्तुच्या किमतीत वाढ झालेली आहे. हि अतोनात वाढलेली महागाई केंद्रसरकारने कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. देशात बेरोजगारी कधि नव्हे ते भरमसाठ वाढलेली आहे. बेरोजगारी ही १४ टक्यापर्यंत गेलेली आहे. मोदी सरकार देशातील लोकांना रोजगार देण्यात अपयशी ठरलेली आहे. असे असतांना सार्वजनिक उपक्रम ज्या मध्ये लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, ते मोदी सरकारने विक्रिचा सपाटा चालविलेला आहे . रेल्वे , विमानसेवा, विमा कंपन्या, पेट्रोलीयम कंपन्या, बँका, बंदरे , बीएसएनएल, सेल, असे अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खाजगी करण करण्याचे धोरण सरकारने बंद केले पाहिजे जेणे करुन लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील . गेल्या वर्ष भरात काही ठरावीक श्रीमंत उघोगपती आणखी श्रीमंत झालेले आहेत. त्यांच्या संपतीत दुप्पटीने वाढ झालेली आहे. परंतू गरीब व मध्यमवर्गीय आणखी गरीब होतांना दिसत आहे. त्यामुळे सरकारचे आर्थीक नियोजन हे पुंजीपती धार्जीने आहे. यात बदल होणे आवश्यक आहे. केंद्र सरकाने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी गत ६ महिण्यापासून देशातील शेतकरी आंदोलन करित आहेत परंतू मोदी सरकार त्यांचे कडे हेतुपरस्सर दुर्लक्ष करित आहे. केंद्रसरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करुन तीनही काळे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी या आंदोलनाचे वेळी करण्यांत आली. धरने आंदोलनात गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, आमदार सहेसराम कोरोटे, कार्याध्यक्ष रत्नदिप दहिवले, काँग्रेस प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, काँग्रेस युवा नेता अशोक ( गप्पु ) गुप्ता , शोशल मिडिया जिलाध्यक्ष एवं जिला महासचिव एड.योगेश अग्रवाल बापू, दामोदर नेवारे, जितेश राणे , जितेन्द्र कटरे, दामोदर नेवारे, अलोक मोहंती, हरिष तुळसकर, रमेश अंबुले, जहिर अहमद, सुर्यप्रकाश भगत , परवेज बेंग , निलम हलमारे, देवेन्द्र दमाहे, गंगाराम बावणकर, अरुण गजभिये, दिनेश तरोने, राजकुमार पटले, मधुसुधन दोनोडे, किशोर शेन्डे , सजंय बहेकार, पवन नागदेवे , आंनद लांजेवार, आकाश उके, चंद्रकुमार बागडे, सुनिल देशमुख, रवि क्षीरसागर, मंथन नंदेस्वर, हंसराज गजभिये इ. पदाधिकारी उपस्थित होते.