काटोल नगर परिषदेवर कुणाची सत्ता ? काटोल नगर परिषद कुणाच्या ताब्यात जाणार? काटोल नगर परिषदेवर कुणाचा झंडा फडकणार?
Summary
काटोल/ विषेश नि.प्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कसली हो घोषणा झाली नसली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंनी शिर्डी अधिवेशन दरम्यान तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाचे सुचक विधान केल्याने या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच सत्ताधारी […]
काटोल/ विषेश नि.प्र.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कसली हो घोषणा झाली नसली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंनी शिर्डी अधिवेशन दरम्यान तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाचे सुचक विधान केल्याने या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भा ज पा चे शतप्रतिशत चे उद्दिष्टे समोर ठेवून राजकिय नेत्यांची ही निवडणूक तयारी सुरू केली आहे.
बहु पुरस्कार प्राप्त मात्र ,मागील तीन वर्षांपासून प्रशासकाचे ताब्यात असलेल्या काटोल नगरपरिषद येणाऱ्या नगर परिषद च्या निवडणुकीत येथील सत्ता मतदार कुणाच्या हातात देतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोक सभा, व विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहता नगर परिषदेचा निकाल हि धक्कादायक लागणार अशी चर्चा काटोल नगरपरिषद क्षेत्रात बोलल्या जात आहे. महाराष्ट्र राज्यात लोक सभा निवडणूकींचा निकाल धक्कादायक लागला. लोक सभा निवडणूका महा विकास आघाडीचे पथ्यावर पडली, लोकसभा निवडनूकीच्या विजयामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष विजयाचे गुंगीत असतांनाच महा युती चे सर्वात मोठा पक्ष भा ज पा ने बुथ निहिय संघटनाबांधणी वर जोर दिला . यासंघटणात्मक बांधणी चां अनपेक्षित महा फायदा महा युतीला झाला. खरे तर महाराष्ट्रात लोक सभा निवडणूकी चे निकालानंतर राज्यातील बेरोजगारी, महागाई, शेतकरी, शेतमजूर, यांचा रोष बघाता महायुती चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेच्या मास्टर स्ट्रोक मुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्रच पार पलटूनच गेले. महायुती चा २८८पैकी २४०चा महाविजयावर स्वता: महायुतीचे नेत्यांचा विश्वास बसत नव्हता!. तर अगदी भुईसपाट झालेल्या महाविकास आघाडी ला विरोधी पक्षनेते पदासाठी झोळी पसरविण्याची वेळ आली आहे. यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. तर अनेक मतदार यात ई व्हि एम वर शंका उपस्थित करतात. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर)मे /जुन २०२५चे दरम्यान होणार ? अर्थात या निवडणुका झाल्यास विधानसभा निवडनूकीला अंदाजे पाच सहा महिन्या चां काळ लोटला असेल!.मतदारांनी आपला कौल लोक सभा व विधानसभा प्रमाणेच ठेवल्यास
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा परिणाम होऊ शकतो. महायुती आपल्या निवडणूक प्रचारात. गल्ली ते दिल्ली एक सत्ता असावी ती ही पंतप्रधान मोदी यांचे हात बळकटी करण “एक है तो सेफ है” “बटेंगे तो कटेंगे” हा मुद्दा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूकीला समोर जाणार,तर अंदाजे ६५ते ७०लाख लाडक्या बहिणींना नियमबाह्य ओवाळणी, राज्यात पेटलेली महागाई, बेरोजगारी, तसेच गावो गावी असलेल्या बंधुता. हे मुद्दे मतदारांना कश्या पद्धतीने समजावून सांगितले जाते यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून असनार आहे.
काटोल नगर परिषदेवर कुणाचा झंडा
मतदार फारच जागरूक झाला आहे. यातच महिशक्ती च्या महायुती चे प्रमुख देवा भाऊ च्या *दूर दृष्टी -दृढ निश्चय* हा विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी प्रत्येक विधानसभेत महाविकास आघाडीचे असंतुष्ट नेत्यांना अदृश्य/दृष्य पद्धतीने केलेली निवडणूक विव्हरचनेने अंतर्गत स्थानिक नेत्यांना दिलेले अर्थपूर्ण अभिवचन पाळले गेल्यास काटोल नगर परिषदेची निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार असे चित्र आज तरी आहे.
काटोल चे नवनिर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या विजयात काटोल नगर परिषद चे विकास कामे महत्त्वाच रोड मैप ठरला. नगर परिषद निवडणुकीत आमदार यांनी काटोल चे विकास मॉडेल संपूर्ण राज्यात अव्वल स्थानावर आणाले आता काटोल च्या विकासाचा डंका देशात वाजविण्यासाठी आपल्या पक्षाला एक हाती विजय मिळवून देतात की देवा भाऊ व चंद्रशेखर दादाचे व परिणयराव यांनी माजी गृहमंत्री यांना परभुत करण्यासाठी प्रायोजीत नियोजना दरम्यान स्थानिक नेत्यांना दिलेले वचनपुर्ती करत येथील निवडणूक लढवणार हे चित्र आज तरी अस्पष्ट असले तरी , काटोल चे राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले शेकाप चे माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, भाजपा चे माजी उपाध्यक्ष हेमराज रेवतकर, समीर उमप, राजू डेहनकर, नितीन डेहनकर, जितू तूपकर, संदिप वंजारी,विषय समीतीचे माजी सभापती देविदास कठाणे,एड केने,राजू चरडे, किशोर गाढवे,विजय महाजन, गणेश चन्ने,प्रवीण लोहे,अय्यूब पठाण, प्रवीण मोहितकर,किंवा मागील २०वर्षापासुन काटोल नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला/ गटाला विजयश्री मिळवून देण्यासाठी महत्वाची भुमिका वठवणारे भाजपा जिल्हा महामंत्री दिशेने ठाकरे किंवा भा ज पा जो उमेदवार देईल तो उमेदवार!!
तर ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, आर पी आय, बहुजन क्रांति सेना, वंचित बहुजन, गगोपा, व आप, याज्ञवल्क्य जिचकार गट, मनसे, यांचे पक्ष प्रमुखांनी दिलेले उमेदवार व अपेक्ष असे षटकोनी सामन्यात कोण बाजी मारणार, हे निवडणूक निकालानंतर च कळू शकेल.???
हा प्रश्न अनुत्तरित असला तरी नगरपरिषद निवडणूक आरक्षणावर खुप काही अवलंबून आहे.