काटोल आगारात प्रवासी बसेस चा तुटवडा शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम जीव मुठीत घेऊन मिळेल त्या वाहनाने करालातो जीव घेणा प्रवास
Summary
कोंढाळी-प्रतिनीधी- दुर्गाप्रसाद पांडे:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या काटोलआगारात प्रवासी बस वाहनांच्या तुटवड्याचा फटका काटोल-नरखेड तालुक्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे बस फे-यांवर होत असून यातही कोंढाळी भागातील आदिवासी बाहूल घुबडी,अहमदनगर, पुसागोंदी,शेकापूर, माहोरखोरा,खापा, धोतीवाडा,मेट,धानोली, खापरी ,धामणगाव, चंदनपारडी कल मुंडा, गरमसुर या गावचे […]

कोंढाळी-प्रतिनीधी-
दुर्गाप्रसाद पांडे:-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या काटोलआगारात प्रवासी बस वाहनांच्या तुटवड्याचा फटका काटोल-नरखेड तालुक्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे बस फे-यांवर होत असून यातही कोंढाळी भागातील आदिवासी बाहूल घुबडी,अहमदनगर, पुसागोंदी,शेकापूर, माहोरखोरा,खापा, धोतीवाडा,मेट,धानोली, खापरी ,धामणगाव, चंदनपारडी कल मुंडा, गरमसुर या गावचे विद्यार्थ्यांना बसत आहे, या करीता कोंढाळी ग्रा पं सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास यांनी राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री व काटोल चे आमदार अनिल देशमुख, व यांचे कडे काटोल आगाराकरिता आवश्यक २५बस गाड्या पुरविण्या करीता निवेदन दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी कांग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष आकाश गजबे यांनी सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे, रा का यु चे प्रज्वल धोटे यांचे सह काटोल आगारात जाऊन आगार व्यवस्थापक डी एम पदमगीरवार यांचे समक्ष काटोल-नरखेड भागातील शाळेकरी विद्यार्थ्यांना बस फेर्या वेळे वर उपलब्ध होत नसल्याने शाळेत येण्यासाठी व परत जाण्याच्या अनेक फेर्या वेळ रद्द होत असल्याने विद्यार्थ्यांना आपले जीव जोखीमेत टाकून (मालवाहू ट्रक, मेटाडोर, जीप, टेंम्पों ऑटो)मिळेल त्या वाहनाने १००%आदिवासी जंगल प्रवण हिंस्त्र पशूंच्या वावर असलेल्या भागातून आप आपल्या गावी रात्री उशिरापर्यंत घरी पोहचावे लागते.
एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतांना दुसरीकडे राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात प्रवासी बस वाहनांच्या कमतरतेची(तुटवड्याचा)फटका प्रवाशी व विषेशतः शाळेकरी विद्यार्थ्यांच्या बस प्रवाशावर होत आहे. या करिता प्रत्येक आगारात प्रवासी बसगाड्या पुरविनव्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष आकाश गजबे यांनी केली आहे.काटोल तालुक्यातील खेडोपाडीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तासनतास एसटी बसची वाट पाहत बसावे लागत आहे. अनेक वेळा वेळेवर बस न आल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
या करीता काटोल आगार व्यवस्थाप यांनी सांगितले की काटोल आगारा करिता ऐकून ७०प्रवासी बस वाहनांची गरज आहे, सध्या ५२बस गाड्या आगारात आहेत, यात मार्गस्थ बिघाड, दैनिक तपासनी (मेंटेनेस),विद्यार्थी सहली असे दररोज पाच सहा बसेस दैनिक प्रवासात कमी पडल्याने उपलब्ध ४५–४६बसेस चे माध्यमातून काटोल-नरखेड , नागपूर कोंढाळी, जलालखेडा, मोवाड या भागात प्रवासी व विद्यार्थी बस सेवा पुरवली जात आहे.आवश्यक बसेस असल्या तर विद्यार्थी व प्रवासी वाहतूक सुरळीत होऊ शकेल असे आगार व्यवस्थापक यांनी सांगितले.
मात्र स्थानिक आगार व्यवस्थापनाचे अधिकारी यांचे प्रवासी वाहतूकीचे योग्य नियोजन होत असल्याबाबत नागपूर जि प सदस्य सलील देशमुख यांनी या बाबत नागपूर विभागीय व्यवस्थापक डी सी तसेच एस टी चे एम डी शेखर चन्ने यांना भेटून काटोल आगाराकरिता आवश्यक बस वाहने व पुर्ण वेळ आगार व्यवस्थापक व अन्य स्टाफची नियुक्ती करिता प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.
मागणी केलीआहे
*बसस्थानकावर सुविधांचा अभाव*
काटोल -नरखेड भागातील शिक्षणा करीता बारा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी बस ने (ये- जा )प्रवास करतात. या परिसरात संप काळानंतर पुर्ववत सुरू झालेल्या प्रवासी सेवा काळात आधीपासूनच एस. टी. महामंडळाची लालपरी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत स्थानकावर बसची वाट पाहत बसावे लागत आहे. या परिसरात घनदाट जंगल असून येथे रात्रीच्या वेळस कोणतीही सोईसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती
काटोल नरखेड तालुक्यामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावे लागते. शाळेत जाण्यासाठी त्यांना एसटीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तालुक्यातील शाळा सायंकाळी चार पाच वाजता सुटते. मात्र, एसटी बस वेळेवरती येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सायंकाळी सात वाजेपर्यंत स्थानकावरच बसावे लागत आहे. मुली वेळेत घरी न पोहोचल्यामुळे घरातील पालक चिंतेत असतात. या अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य सरकार व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
केंद्र व राज्य सरकार ‘बेटी बचाव बेटी पढाव’ची घोषणा करतात. परंतु, शासनच मुलींच्या शिक्षणाकडे मात्र लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. सायंकाळी सात वाजले तरी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. तसेच, बसस्टॉपवरदेखील सडक छाप मजनूंचा त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांनींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वेळेवर मुले घरी नाही आली, तर पालकांना स्वत:ची गाडी घेऊन जावे लागत आहे.
आम्हाला शासनाने वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी. बस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आम्हाला शाळेतील अभ्यास पूर्ण करता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, आमच्या भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे घरीदेखील काही संपर्क होत नाही. त्यामुळे आम्ही घरी पोहोचेपर्यंत पालकदेखील चिंतेत असतात.
*अनेकविद्यार्थीनी.
एस. टी. बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून शासनाकडून आवश्यक प्रवासी बस वाहने व वेळेवर एसटी बस सेवा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी व विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी.
– सतीश पाटील चव्हाण
पालक
एस.टी. महामंडळाची लालपरींची संख्याही कमी आहे, आहे त्या बसेस मार्गस्थ वारंवार बंद पडत आहे. तसेच, एसटी डेपोतून बस निश्चित वेळेत सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी एसटी वरिष्ठ व डेपोतील अधिकार्यांना वारंवार निवेदन देऊनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सुधीर गोतमारे, चंद्रशेखर ढोरे,ज्योत्स्ना मरकाम,पदम पाटील डेहणकर, राजकुमार चोपडे, बबलू बिसेन,थामस निंभोरकर, नागोराव हिंगवे,सतीश पुंजे,हरिष राठोड,धनराज ढोबळे,रामचंद्र चव्हाण, प्रकाश बारंगे, संजय नागपुरे, राजू किनेकर,
संबधीत गावांचे सरपंच व लोकप्रतिनिधी👆