ऑल इंडिया डान्स चॅम्पियन GRANd फिनाले आदर्श विद्यालय सिहोरा येथे भेट :-आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे

स्व.मनोजकुमार सहारे, स्व. रवीकुमार बागडे,स्व. गणेश भदाडे, व युगांधर संस्थापक, स्व. जीवनलाल चौधरी, यांच्या स्मृतीपित्यर्थ ऑल इंडिया डान्स चॅम्पियन GRANd फिनाले जलवा वर्ष 8 व्या आदर्श विद्यालय सिहोरा येथे आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी भेट देऊन दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाच्या आस्वाद घेतला, त्याप्रसंगी आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, आमदार साहेब म्हणाले हा उपक्रम राबवल्याबद्दल मी आयोजक संस्थांचं आणि सर्व सहभागी शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, बालगोपाल यांचे मनःपूर्वक कौतुक केलं आणि या उपक्रमासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, ग्रामवाशी, बाळगोपाल, शिक्षक शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होते.