आमदार नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवसा निमित्त खासदार डॉ.नामदेव किरसान यांची भेट.
Summary
साकोली जि.भंडारा येथे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार मा. नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस साकोली येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसा निमित्त गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवजी किरसान यांनी भेट देऊन नानाभाऊ पटोले यांना […]

साकोली जि.भंडारा येथे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार मा. नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस साकोली येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसा निमित्त गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवजी किरसान यांनी भेट देऊन नानाभाऊ पटोले यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, चिमुर विधानसभा समन्व्यक डॉ.सतिस वारजुरकर, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अँड.विश्वजित कोवासे, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, माजी नगरसेवक रमेशभाऊ चौधरी, सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया इसुलालजी भालेकर, जिल्हा महासचिव रामसिंग चव्हाण, अध्यक्ष आदिवासी काँग्रेस मोतीलाल पिहदे, अँड.दुष्यंत किरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले तालुकाध्यक्ष चिमुर डॉ.विजय पाटील गावंडे, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत पाटील राऊत, जितेंद्र पाटील मुनघाटे, हरबाजी मोरे, ढिवरु मेश्राम, गोपाल पाउलझगडे, गौरव येणप्रेडीवार, विपुल एलटीवार, कुणाल ताजने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.