▪ लावूनी कोलीत ।▪ ▪ माझा करितील घात।।▪ ▪ ऐसे बहुतांचे संधी ।▪ ▪ सापडलो खोळे मधी ।।▪ ▪ पाहातील उणे । ▪ ▪ तेथे देती अनुमोदने ।। ▪ ▪ तुका म्हणे रिघे । ▪ ▪ पुढे नाही जाले धिंगे ।।▪ ▪ संत तुकाराम महाराज▪ ▪ एक थोर समाज सुधारक▪ ▪ एक क्रांतिकारी संत ▪
▪ पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪
० देव आणि धर्माची दहशत पसरवून त्याआधारे घामाचा थेंब न गाळता उच्च दर्जाचे जीवनमान आणि रक्ताचा थेंब न गाळता सुरक्षा मिळवणाऱ्या वैदिक पुरोहित वर्गाची मक्तेदारी संत तुकाराम महाराज मोडून काढू पाहत होते . कर्मकांड नाकारत होते. देव आणि भक्त यामधील पुरोहितांची मध्यस्थी अमान्य करत होते. दैवाधीन समाजाला कर्मवाद समजावून सांगत होते जातिभेदाच्या भिंती गाडु पहात होते.
० अभंगाच्या पहिल्याच ओळीत संत तुकाराम महाराज इतक्या स्पष्ट शब्दात आपले उद्या काही बरे वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार असेल त्याची नोंद करून ठेवतात. वास्तविक पाहता संत तुकाराम महाराजांचे वैदिक ब्राह्मण पंडिता बरोबर चे वैर व्यक्तिगत कारणातून निर्माण झालेले नव्हते तर वैदिक ब्राह्मण पंडितांच्या अनैतिक संस्कार व संस्कृती विरोधी वैचारिक भूमिकेतून झाले होते.
० वैदिक मनुवादी ब्राह्मणांची संगत सोडा हे संत तुकाराम महाराजांनी बहुजनांना निक्षून सांगितले त्यांनी यज्ञ ,होम , हवन, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, दशक्रिया पुरोहित गिरी, पंचांग , भविष्य याविरुद्ध मोहीमच उघडली होती. त्यामुळे वैदिक ब्राह्मण संत तुकाराम महाराजांच्या विरोधात संघटितपणे उभे राहिले ते पदोपदी संत तुकाराम महाराजांना त्रास देऊ लागले. वैदिक ब्राह्मणाकडून त्यांच्यावर होत असलेले शाब्दिक आणि शारीरिक हल्ल्यातून संत तुकाराम महाराज म्हणतात.
। मरणाही आधी
राहिलो मरोनी ।।
। मग केले मनी होते तैसे ।।
० तुकाराम महाराज म्हणतात की मी प्रत्यक्ष मरणाच्या ही आधी जिवंतपणीच स्वतःचे मरण अनुभवले आहे आणि त्यानंतर माझ्या मनात जे काही होते ते केले आहे, वैदिक धर्म पीठाने तुकाराम महाराजांना त्यांचे अभंग बुडवण्याची आणि घरदार जप्त करण्याची शिक्षा ठोठावली . तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आले. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य अजून गर्भावस्थेतच होते अशा परिस्थितीत तुकाराम महाराज हा सारा संघर्ष एकट्याच्या बळावर शब्दाचीच शस्त्र करून लढत होते.
० डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते कि संत तुकाराम महाराजांची गाथा वगळता संपूर्ण ब्राह्मणीसाहित्य जरी समुद्रात बुडवले तरी मला फारसं काही दुःख होणार नाही आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक या मुख्य पत्राच्या पहिल्या पानावर सर्वात वर संत तुकाराम महाराजांचा अभंग लिहून आपल्या मुखपत्राचे उद्दिष्ट काय आहे हे इथल्या मनुवादी, विषमतावादी, ब्राह्मणी व्यवस्थेला दर्शवण्याचा प्रयत्न केला ……………………….
० काय करू आता
ठेवूनिया भीड ।
० निशंक हे तोंड वाजविले ।।
० नव्हे जगी कोणी मुकीयाचा
जान ।
० सार्थक लाजून नव्हे हित ।।
० नाही नाही ते खटाटोप आणि आता पिटा करून ही संत तुकाराम महाराजांचे प्रबोधन कार्य थांबत नाही. हे पाहून वैदिक ब्राह्मणांनी संत तुकारामाची गाथा धर्मविरोधी घोषित करून इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवण्याचा अघोरी आदेश देण्यात आला त्यासाठी काशीहून धर्मपिठाचार्य बोलावण्यात आले. त्यांच्यासमोर तुकारामाला पाचारण करून शास्त्रा ची तर्कट चर्चा करण्यात आली. हे अर्थात ढोंग होते. तुकाराम जे लिहितो सांगतो ते धर्मविरोधी आहे , हे ठरवण्याचा डाव ठरलेला होता. त्यानुसार तुकारामाचे अभंग नष्ट करण्यात यावे असा निर्वाळा वैदिक धर्म न्याय पीठाने दिला तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये सबंध बाड तुकारामाच्या हाताने इंद्रायणी बुडवले गेली कारण काय तर तुकाराम कुणबी अर्था वर्णाने शूद्र (ओबीसी ) त्यामुळे एका ज्ञानप्राप्तीचा आणि विचार मांडण्याचा अधिकारच नाही. शूद्राचे म्हणजे (ओबीसी ) चे विचार म्हणजे घोर पातक त्यामुळे धर्मभ्रष्ट होतो. देवाचा प्रकोप होतो म्हणून हे आक्रीत( तुकारामाचे अभंग ) नष्ट केले पाहिजे.
० हजारो वर्षापासून पिढ्यानुपिढ्या मुक्या असलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा आणि वेदना संत तुकाराम महाराजांनी आपल्या 5000 अभंग गाथेच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला कारण भारतातील वैदिक ब्राह्मणी धर्म ग्रंथांनी बहुजन समाजाचा बोलण्याचा, लिहिण्याचा , वाचण्याचा , एवढेच नव्हे तर त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार नाकारला होता. संत तुकाराम महाराजांनी या प्रचलित धर्मग्रंथाचे प्रामाण्य स्वतःही नाकारले आणि इतरांनाही करण्यास सांगितले .
० उर्वरीत पुढील लेखात ०
० पोलिस योद्धा वृत्तसेवा ०
० महेश देवशोध (राठोड )०
० वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ०
०73 78 70 34 72 ०