▪ परंपरा ▪ ▪ नांगर, विळी ,कोयता, खोर साधनांची पूजा▪ ▪ पोळा भारतीय संस्कृतीचा जीवन धर्म▪ ▪ आपल्या उपकार कर्त्या – विषयी पुज्यता व कृतज्ञता सद्भावना व्यक्त करणे हा आपला परंपरागत कुळाचार▪ ▪माझ्या श्रमकरी बैलांची आज पूजा▪

० वर्धा, पोलीस योद्धा वृत्तसेवा ०
श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्यात येतो. पोळा हा बैलांचा सण आहे. कृषी प्रधान देश असल्यामुळे शेतकरी समाज जीवनात या सणाचे महत्त्व आणि महात्म्य मानव आणि प्राणी यांच्या एक वृत्तीचे प्रतीक आहे. पोळा म्हणजे बैलाच्या रूपाने श्रम देवतेची पूजा करण्याचा दिवस होय. या दिवशी शेतीच्या कामासाठी उपयुक्त नांगर, खोर, विळा, कोयता,मोट, आदी साधनांची प्रमुख्याने बैलाची पूजा करण्यात येते . कृषिप्रधान असल्याने आणि समग्र शेतकऱ्याचे जीवन यावर अवलंबून आहे. बैलांना आपल्या समाजजीवनात व संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कृषिप्रधान असल्याने आणि समग्र शेतकऱ्यांचे जीवन बैलांवर अवलंबून आहे . बैलांना आपल्या समाजजीवनात व संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आता यंत्रयुग आले असले तरी बैलाच्या सर माला पर्याय नाही . ट्रॅक्टर सारखी महाग, अवाढव्य यंत्रसामुग्री सधन शेतकरीच घेऊन वापरू शकतो. सामान्य कष्टकरी शेतकऱ्याला ती शक्य नसते. म्हणून शेतकऱ्यांचा बैल आणि गरिबाची बायको आजारी पडू नये. अशी एक ग्रामीण प्रचलित म्हण आहे या म्हनीवरनच शेतकऱ्याच्या जीवनातले बैलाचे महत्त्व कसे व किती अनिवार्य आहे. हे सहज पटते. बैलाचे हे ऋण कदापि फेडू शकत नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा अत्यंत आत्मियतेने साजरा केला जातो.
शेतातील पेरण्या झाल्या नंतर शेतीच्या कामातून बैल रिकामी झाले म्हणजे एक दिवस आपल्या अन्नदात्या बैलांना न्हांऊ- माखू घालतो त्यांची पंच- आरती ओवाळायची त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवायचा अशी प्रथा आहे .
० पोळा भारतीय संस्कृती
चा जीवनधर्म ०
प्रत्येक गावात वेशीवर मारुतीरायाचे मंदिर असते . मारुती हे बुद्धी व चपळतेचे दैवत असल्यामुळे हे गुण माझ्या श्रमकरी बैलांमध्ये सतत वसु दे त्यात त्यांना कुणाचीही दृष्ट लागू नये ही मनोमन भावना असल्यामुळे बैलांना मारूतीच्या देवळात नेण्याची प्रथा आहे . आपल्या उपकार कर्त्याविषयी पूजेचा व कृतज्ञता सदभावना व्यक्त करणे हा आपला परंपरागत कुळाचार असून भारतीय संस्कृतीचा जीवनधर्म आहे. पोळा सण साजरा केल्याने शेतात विपुल धान्य पिकते गोठ्यात गोधनाची वृद्धी होते .अशी लोक समजूत आहे.
० मिरवणूक , शोभायात्रा ०
पोळ्याच्या दिवशी बैलांच्या शिंगांना हे हीगूळ व बेगड लावतात. गळ्यात सुंदर माळा वं पायात घुंगरू बांधतात. पाठीवर रंगीबेरंगी झुल खोरी टाकून नाना तऱ्हेने आकर्षक बैलांना रंगवून मनमोहन करून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक शोभायात्रा काढतात. असा हा उत्साहाचा अनोखा थाटमाट अपूर्वाई असते . आदल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात येते. पोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन आंघोळ घालतात. नंतरच चरायला नेऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात याला खान शेखणी असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी बैलाच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड , डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या. घुंगराच्या माळा, नवीन वेसन, नवा कासरा गळ्यात पितळी तोडे तसेच साल गड्याला नवीन कपडे देण्यात येते.
▪ पोलीस युद्धा वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध (राठोड) ▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72▪