▪आला श्रावण श्रावण▪ ▪ श्रावण काय आहे ?▪ ▪महेश देवशोध (राठोड)▪ ▪ माजी संघटक अंधश्रद्धा निर्मूलन समिति▪
० पोलीस योद्धा वृत्तसेवा ०
माणूस जेव्हा रानटी अवस्थेत राहत होता, तेव्हा तो कोणताही धर्म वा श्रावण पाळत नव्हता . मानवाच्या उत्क्रांत अवस्थेत मानव कल्याणासाठी धर्म निर्माण झाला .
सर्वप्रथम जैन व नंतर बौद्ध. परंतु जैन धर्मातील ‘ ‘ ‘अहिंसा परमो धर्म ‘ या आत्यंतिक टोका मुळे व त्या व्यवहार्य तत्त्वामुळे जैनधर्म फारसा प्रचलित होऊ शकला नाही . त्यानंतर साधारणत: दोन दशकानंतर बुद्धाच्या विचारांनी तत्कालिन व नंतरचा मानवी समाज प्रभावित होत गेला .परंतु नंतरच्या काळात धर्माच्या ठेकेदारांनी त्याच धर्मातील तत्त्वांचा उपयोग समाजाच्या शोषणासाठी केला. आज प्रचलित प्रथा परंपरांना वेगळ्याच धार्मिक रंगाने सजवून मांडले जाऊ लागले. ” श्रावण ” मासातील उपवास ही त्यापैकी एक परंपरा .
श्रावण महिन्यात उपवास केला जातो ; आणि पोथ्या पुराणाचे वाचन केले जाते. भारताच्या इतिहासात बौद्ध धर्माचा इतिहास गौरवशाली होता . बुद्धाने ब्राह्मणी वर्णव्यवस्थेच्या विरोधात बंड करुन ती व्यवस्था नष्ट केली आणि समतेची दारे खुली केली . सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्म समृद्धीच्या परमोच्च शिखरावर विराजमान होता . परंतु त्याचा वारसा पुढे नेणाऱ्या बृहद्रथ मौर्याची (बौद्ध सम्राट) पुष्पमित्र शुंग या ब्राह्मण सेनापतीने षडयंत्र रचून हत्या केली ; बौद्ध भिक्षूंची कत्तल केली आणि संपूर्ण बौद्ध व्यवस्था नष्ट करण्याचा सपाटा सुरू केला . इतकेच नव्हे तर ती समूळ नष्ट करण्यासाठी त्याने बौद्ध संस्कृतीचे विकृतीकरण करण्यास प्रारंभ केला . उदाहरणार्थ ज्या पिंपळवृक्षाखाली बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्या बोधिवृक्षा ची बदनामी करण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण केली . पिंपळाखाली मुंजा नावाचे भूत राहत असते; अशी अफवा पसरवली तसेच त्या ऐवजी एक काल्पनिक कथा रचून बायकांना वडाच्या झाडाची पूजा करण्यास प्रवृत्त करून पिंपळाचे पावित्र्य नष्ट करून समाजाला पिंपळा कडून वडा कडे नेले .
बौद्ध धर्माची दीक्षा घेताना केशवपन केले जाते ; पण ब्राह्मणांनी माणसाच्या मृत्यूनंतर केस काढण्याची प्रथा सुरू केली.
कोणत्याही मंगल प्रसंगी बौद्ध लोक शुभ्र वस्त्र परिधान करतात . परंतु ब्राह्मणांनी माणसाच्या मृत्यूनंतर पांढरे कपडे घालण्याची प्रथा सुरू केली .
‘ बुद्ध ‘ हा शब्द बुद्धी , बोधी व ज्ञान प्राप्ती या शब्दाशी संबंधित आहे. परंतु त्याचे विकृतीकरण करून त्याला बुद्धू म्हणजे मूर्ख या अर्थाने रूढ केला . तसेच वयस्क व जेष्ठ भिक्खूंना थेरो व महाथेरो असे संबोधले जाते ; परंतु ब्राह्मणांनी कोणत्याही म्हाताऱ्यास संबोधण्यासाठी थेरडा हा शब्द साहित्यातून रूढ केला .
विहारांची व त्यातील मुर्त्यांची तोडफोड करून त्यांचे वेगवेगळ्या तीर्थस्थानात रूपांतर केले .
अशी अनेक उदाहरणे याबाबत देता येतील . अशाप्रकारे ब्राह्मणांनी बौद्ध विचारांची व संस्कृतीचे विकृतीकरण करून त्याला नवीन नाव दिले. तो ब्राह्मणी धर्म होय ; परंतु त्याला हिंदू धर्म असे नाव दिले आहे .
० श्रावण महिना काय आहे ? ०
इसवी सन पूर्व सहाव्या शतकात निर्माण झालेल्या बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार बुद्धाच्या नंतर मुख्यत: बौद्ध भिक्खूनवर होता. ते गावोगावी जाऊन बौद्ध धम्माचा प्रचार करीत असत. परंतु पावसाळ्याच्या काळात सर्वत्र गवत उगवलेले असायचे . झाडी झुडपे वाढलेली असायचे . त्या काळात आजच्यासारखी रोड , वीज , प्रकाश नसायचा त्यामुळे त्यांना गावोगावी चिखल तुडवत प्रवास करणे शक्य होत नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन सम्राट अशोक मौर्याने भिख्खूंना राहण्यासाठी गावापासून दूर काही अंतरावर डोंगरात मोठमोठ्या लेण्या विहारे निर्माण केले . त्या विहार लेण्यांमधून भिख्खू राहत असत त्यालाच वर्षावास म्हणतात. पावसाळ्याचे तीन महिने तेथे राहून ते लोकांना बौद्ध धम्माचे प्रवचन देण्याचे काम करीत असत. लोक देखील तेथे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत. या वर्षावास काळात या प्रमाणे बौद्ध भिक्खू ” वीकाल भोजना वेरमणी ” सिक्खापदं समाधी यामी ” शीलाचे पालन करीत असत; त्याचप्रमाणे उपासक लोक देखील या काळात उपोसथ पाळत असत . परंतु ही वर्षा वासाची परंपरा पूर्णपणे नष्ट करणे त्यांना शक्य झाली नसल्याने एक वेगळी कथा रचून या श्रावण महिन्यात ब्राह्मणांनी तसाच उपवास करण्याची वेगळी प्रथा पाडली . आज ब्राह्मण उपवास करतात ; पण उपवासाच्या दिवशी अनेक प्रकारचे नवनवे पदार्थ करून खातात उदाहरणार्थ साबुदाण्याची खीर, श्रीखंड , तुपाची खिचडी , वेफर्स , रताळे , मसाले दूध इत्यादी परंतु शारीरिक मेहनतीचे कामे करणारी माणसं मात्र कडकडीत उपवास पाळतात . त्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली हानी भरून निघत नाही व त्यांचे शरीर कृश बनते. परिणामांत: अनेक आजारांना बळी पडावे लागते व ते लवकर मरतात .
मटन केव्हा खावे व केव्हा खाऊ नये ; हे ब्राह्मण सांगतील तसे आपण करतो कधी प्रश्न विचारतो का? आपण; अमुक दिवशी का? तमुक दिवशी का ? का नाही मटन रविवारी खावे कारण ख्रिश्चन त्या दिवशी चर्च मध्ये जातात. शुक्रवार हा दिवस मुस्लिमांशी व बुधवार बुद्धाच्या नावाची मिळताजुळता आहे याचा अर्थ असा की इतरांच्या पवित्र दिवशी आपण अपशकुन केल्याप्रमाणे वागायचे यालाच ब्राह्मण धर्म म्हणावे; हिंदू धर्म नाही.
तात्पर्य ; भारतातील आजच्या प्रत्येक हिंदूधर्मीय नागरिकांचे पूर्वज बौद्ध होते . इतर कोणताही धर्म त्या काळात अस्तित्वात नव्हता . बुद्धपूर्व काळात हिंदू संस्कृती , द्रविड संस्कृती आणि वैदिक संस्कृती होती . धर्म नव्हते ह्यावरुन बौद्धधर्म हा या देशातीलच नव्हे; तर संपूर्ण विश्वातील मूळ धर्म असून नंतरच्या काळात निर्माण झालेल्या सर्व धर्माचे अधिष्ठान आहे . याचा आपण विचार केला पाहिजे . यावरून श्रावण कसा पाळायचा याचा प्रत्येकाने विचार करावा .
मला तथाकथित श्रावण मास पाळण्याचा प्रश्नच नाही .
▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा▪ ▪महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72 ▪