युवा राष्ट्र संत भय्यूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Summary
कोंढाळी – वार्ताहर युवा राष्ट्र संत भय्यूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोंढाळी ग्रामपंचायतीचे सरपंच केशवराव धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली 29 एप्रिल रोजी सर्वोदय परिवारातील राजू चोपडे यांच्या कुटुंबियांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया […]

कोंढाळी – वार्ताहर
युवा राष्ट्र संत भय्यूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोंढाळी ग्रामपंचायतीचे सरपंच केशवराव धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली 29 एप्रिल रोजी सर्वोदय परिवारातील राजू चोपडे यांच्या कुटुंबियांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया कोंढाळी शाखा व्यवस्थापक पंकज तिमांडे, लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुधीर बुटे, काटोल पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खामकर, मासोद चे माजी सरपंच भाई विश्वनाथ धारपुरे. , सामाजिक कार्यकर्ते ब्रजेश तिवारी, राजू पाटील, दुर्गा प्रसाद पांडे, अशोक मानकर व आनंदी चोपडे आदींनी उपस्थित विद्यार्थी व त्यांचे पालक व सर्वोदय परिवारासमक्ष प
युवा राष्ट्र संत परम पूज्य भय्यूजी महाराज यांनी शेतकऱ्यांची प्रगती, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, पर्यावरण, विज्ञान व जलसंधारणाविषयी केलेल्या कामांचा उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजू चोपडे म्हणाले की, परमपूज्य श्री संत भय्यूजी महाराज अध्यात्मवाद आणि विज्ञान तसेच भक्ती- ईष्ट-उद्देश- आणि चिंतन यातून आपला देश एक आदर्श राष्ट्र बनेल असा उपदेश करत असत असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन राजेश्वरी पांडे यांनी तर आभार सपना चोपडे यांनी मानले.