“महाराष्ट्र दिन (1 मे) कोंढाळी येथे उत्साहात साजरा”
कोंढाळी – वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे
०१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.
०१ मे रोजी महाराष्ट्रातील सर्व राज्य सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांमधून राष्ट्रध्वज फडकवला जातो. कोंढाळी येथील नायब तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार भागवत पाटील, कोंढाळी पोलीस स्टेशन येथे ठाणेदर पंकज वाघोडे, वनपरिक्षेत्र कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढाळी- नागपूर जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई चाफले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राजेंद्रसिंग (आर. बी.) व्यास महाविद्यालय- डॉ.-प्रा. महेंद्रसिंह राठोड,
या सोबतच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम पंचायत कोंढाळी- कोशवराव धुर्वे, खुरसापारचे सरपंच सुधीर गोतमारे, धुरखेडा-सरपंच-विठ्ठल
राव उके व लगतच्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी आपापल्या ग्रामपंचायतींचे ध्वजारोहण केले. तसेच आपापल्या भागात बालविवाह रोखण्याची ग्रा प पदाधिकारी, शिक्षक, नागरिक आदींनी सामुहिक शपथ घेतली.
कोंढाळी जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई चाफले यांनी शाळेच्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी पंचायत समिती सदस्या लताताई धारपुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चाफले, दुर्गाप्रसाद पांडे यांनी मार्गदर्शन केले तसेच शाळा समितीचे एकनाथ पाटील, सुनील चरडे, मनीषा कोचे हर्षाली अवचट उपस्थित होते. प्रस्ताविक मुख्याध्यापक रजनी मानकर यांनी केले.संचलन सहायक शिक्षक दिलीप चौके यांनी तर आभार सहायक शिक्षक छत्रपती रक्षित यांनी मानले.