भू-जल व्यवस्थानावर योग्य लक्ष दिले नाही तर येनारा भविष्यकाळ आपल्याला माफ करनार नाही एड डी ओ -श्रीकांत उंम्बरकर
Summary
कोंढाळी घसरणाऱ्या भूजल पातळीला आळा घालून, भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जल संधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाय योजनांद्वारे भूजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा अटल भूजल योजनेचा मुख्य हेतु असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे. भूजलाच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण […]
कोंढाळी
घसरणाऱ्या भूजल पातळीला आळा घालून, भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जल संधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाय योजनांद्वारे भूजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा अटल भूजल योजनेचा मुख्य हेतु असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे. भूजलाच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र शासन व राज्य सरकार व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्या येणार आहे.
तरीही सर्व सामान्य नागरिकांनासाठी पेयजल, शेतकर्यां चे शेती साठी लागणारा पाऊस यांचे संवर्धन ते ही गुणात्मक पाणी साठा करण्या साठी जन सहयोगातून जल संवर्धन काले नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करनार नाही असे मत काटोल चे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंम्बरकर यांनी * भारत सरकार जलशक्ति मंत्रालय, जलसंसाधन, नदी विकास तसेच केंद्रिय भूमी जल बोर्ड, मध्य क्षेत्र नागपुर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन भू जल सर्वेक्षण विकास यंत्रणा नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतरगत सार्वजनिक संवाद कार्यक्रम यांचे संयुक्त विद्यमाने भू जल व्यवस्थापन आणिअटल भू जल योजनेचे व्यवस्थापन योजने च्या कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी व नागरिकां समक्ष मार्गदर्शन केले।
या प्रसंगी केंद्रिय भूजल बोर्ड मध्य क्षेत्र नागपुर चे प्रमुख कार्तिक डोंगरे, यांनी पाणीपुरवठा करीता आवक व जावक बाबद समजाऊन सांगितले तर!खुर्सापार चे सरपंच यांनी मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे.या करीता जल संवर्धन किती महत्वाचे आहे या बाबद सरपंच सुधीर गोतमारे यांनी सांगितले, तर वरिष्ठ भू वैज्ञानिक डाॅ वर्षा माने यांनी अटल भू जल योजने अंतरगत येणारे कार्यक्रम तसेच काटोल तालुक्यातील खालावलेली भू जल पातळीचे कारन व या मधून करायचे जलसंग्रहण व संवर्धन योजना व क्रियान्वयन या बाबद माहीती दिली।
तसेच भू वैज्ञानिक राजेश गावंडे यांनी लोक सहभागातून जल सुरक्षा आराखडा कसा तयार करायचा विविध शासकीय यंत्रणेचा कन्वर्जन च्या माध्यमातून सहभाग कसा साधायचा याबाबत मार्गदर्शन केले तसेच भू वैज्ञानिक पोर्णिमा बाराहाते, भू वैज्ञानिक यांनी जलभूत मॅपिंग मधे काटोल तहसील ची शास्वत सध्या स्थिती बाबद तर अवश्विन अटे यांनी भूजल संशोधन 2020तसेच काटोल च्या भू जल बाबद माहीती दिली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन भू जल वैज्ञानिक राहूल शेंडे यांनी केले, या कार्यक्रमाचे संचलन भू वैज्ञानिक राजेश गावंडे तर आभार सामाजिक विकास तज्ञ नामदेवराव झोंबाडे यांनी केले।
या प्रसंगी काटोल पं स चे मा/जी उपसभापती योगेश गोतमारे, उपसरपंच प्रदिप सालमे, कांचनताई तायवाडे, संजय गोतमारे, रणजीत तायवाडे व दुर्गाप्रसाद पांडे यांनी जलसंधारण प्रसंगी येणार्या समस्या मांडल्या त्यावर भू जल वैज्ञानिकांनी योग्य ते समर्पक उत्तरे दिली. या प्रसंगी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग काटोल उपअभियंता बावणे भूवैज्ञानिक श्रीमती गोटे,व या भागातील शेतकरी उपस्थित होते।