ब्लॉग

पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घराघरात पोहचण्यासाठी वाचकवर्ग वाढणे गरजेचे – डॉ. संजय बापेरकर

Summary

स्वतःसाठी सगळेच घर बांधतात परंतु पुस्तकांसाठी घर बांधणारे जगातील एकमेव पुस्तकप्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.त्यामुळे आजच्या पुस्तक दिनी वाचकवर्ग वाढवण्याचा व बाबासाहेब घरा-घरात पोहचविण्याचा संकल्प केला पाहीजे असे डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे. लांजा तालुका बौध्दजन मंडळ मुंबई/ग्रामीण च्या वतीने लांजा […]

स्वतःसाठी सगळेच घर बांधतात परंतु पुस्तकांसाठी घर बांधणारे जगातील एकमेव पुस्तकप्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.त्यामुळे आजच्या पुस्तक दिनी वाचकवर्ग वाढवण्याचा व बाबासाहेब घरा-घरात पोहचविण्याचा संकल्प केला पाहीजे असे डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे. लांजा तालुका बौध्दजन मंडळ मुंबई/ग्रामीण च्या वतीने लांजा येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
लांजा तालुक्यातील तमाम आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने जयंती उत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन पासुन लांजा बाजारपेठेतुन काळे छात्रालय प्रांगणात “भव्य धम्म रॅलीचे”आयोजन करण्यात आले होते.विविध सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी रॅलीमध्ये भाग घेतला होता.सदर कार्यक्रमास मुंबई मंडळांचे उपाध्यक्ष व्हि.के. कांबळे, चिटणीस प्रकाश पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीणचे संतोष जाधव,सचिन जाधव,लवु कांबळे,धर्मदास कांबळे,गणपत लांजेकर,अनिरुद्ध कांबळे,श्रीकांत काबळे यांनी परिश्रम घेतले.
“धम्मपद एक धम्मदेसना”या अरविंद मोहीते निर्मित प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *