पवनी प्राचीन बौद्ध स्थळ आणि भंडारा स्तूप.
Summary
महाराष्ट्राच्या विदर्भातील भंडारा जिल्हयातील वैनगंगेच्या काठावर असलेले पवनी हे बौध्दधर्मियांचे महत्वाचे स्थान असून इसवी सन १९६९ साली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात नागपूर युनिव्हर्सिटीच्या उत्खनन शाखेने केलेल्या उत्खननात येथे प्राचीन बौध्दकालीन स्तूप सापडला आहे. हा स्तूप अशोक पूर्वकालीन असून शुंगकाळी हा […]
महाराष्ट्राच्या विदर्भातील भंडारा जिल्हयातील वैनगंगेच्या काठावर असलेले पवनी हे बौध्दधर्मियांचे महत्वाचे स्थान असून इसवी सन १९६९ साली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात नागपूर युनिव्हर्सिटीच्या उत्खनन शाखेने केलेल्या उत्खननात येथे प्राचीन बौध्दकालीन स्तूप सापडला आहे. हा स्तूप अशोक पूर्वकालीन असून शुंगकाळी हा वाढविण्यात आला. या स्तूपाच्या दक्षिणेला अर्धा किमी अंतरावर ‘चांदपूर स्तूप’ नावाने ओळखला जाणारा आणखी एक स्तूप सापडला आहे. प्राचीन काळातील हे बौध्दधर्मियांचे एक महत्वाचे नगर होते. येथे अनेक प्राचीन अवशेष विखुरलेले आहेत. पवनीपासून ३ किमी अंतरावरील महासमाधीभूमी येथील सिंधपुरी बौध्दविहारही पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे…