BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

🔹 जिल्हाच्या सीमेवरील वास्तव 🔹 🔸विचारपूस न करताच दिली जातेय जिल्ह्यात एन्ट्री🔸 🔹चेकपोस्टवर ई – पास ठरतेय कागदी घोडा 🔹 🔸खडका व कौंडन्यपूर येथे चेकपोस्ट नाही🔸

Summary

वर्धा , जिल्हा प्रतिनिधी. : कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पास क्रमप्राप्त करण्यात आली आहे. पण जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर ई- पास कागदी घोडा ठरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. इ तकेच नव्हे तर […]

वर्धा , जिल्हा प्रतिनिधी. : कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-
पास क्रमप्राप्त करण्यात आली आहे. पण जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर ई- पास कागदी घोडा ठरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. इ तकेच नव्हे तर सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दादा कडून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना साधी विचारपूस केली जात नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. कोविड च्या वाढत्या प्रादुर्भावा ला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निरबन्ध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या ना ई – पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अति महत्वाचे
कामासाठी ही ई- पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगदी साध्या साध्या कामासाठी अनेक व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खाजगी वाहनाने जात आहे . विशेष म्हणजे अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करणारी वाहने तसेच रुग्णवाहिका यांनाच सूट दिली आहे, तर ई – पास नसलेल्यांना जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवरून परत पाठविणे क्रमप्राप्त असतांना चेकपोस्टवरील कर्मचारी ये-जा करणाऱ्यानची साधी नोंदही न घेतांना दिसून आले.

🟡 विदेशी दारूचीही होतेय
आयात 🟡
वर्ध्या जिल्हा दारुबंदी जिल्हा म्हणून ओळख ल्या जाते पण सध्या संचारबंदीच्या काळात शेजारच्या जिल्यातून छुप्या पद्धतीने विदेशी दारूची आयात दारू विक्रेते करीत आहेत . जिल्ह्याच्या सीमेवर कसून चौकशी झाल्यास दारूच्या अवैध वाहतुकीला ब्रेक लागणार आहे, परंतु पोलीस प्रशासन त्यासाठी सकारात्मक नसल्याचे दिसते .
🟣 वर्धेला चार जिल्ह्याचा
वेढा 🟣

वर्धा जिल्ह्याला नागपूर, अमरावती ,चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागून आहे . त्या ठिकाणी बॅरिकेतस लागले आहे. तरी या ठिकाणी अनेकांचे आवागमन सुरु आहे .

🟤 ई- पास च्या नियमांची अमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर काही ठिकाणी तात्पुरती पोलीस चौकी तयार करून तेथे पोलीस आणि काही अधिकारी तैनात करण्यात आले आहे. पण तेही जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना साधी विचारपूस करीत नाहीत .

🔵 जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून मागील वर्षी जिल्हा बंदी दरम्यान आर्वी तालुक्यात सात आष्टी पाच तर कारंजा तालुक्यात तीन ठिकाणी चेकपोस्ट होते . तर जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यात जाणाऱ्या चोरवाटा तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात बंद करण्यात आल्या होत्या.

🟩 मध्यप्रदेशात जाणाऱ्या
मार्गावर चेकपोस्ट नाहीच 🟩

आष्टी तालुक्यातील दृगवाडा मार्गे अमरावती जिल्हा होत मध्यप्रदेशात जात येते , परंतु या मार्गावर चेकपोस्टच नाही.
केवळ एका गृहरक्षकावर जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे येथे कुठल्याही।वाहनांची तपासणी होत नाही.

🔘 खडका व कौडण्यापूर
येथे चेकपोस्ट नाही 🔘

देउरवाड़ा – कौडण्यापूर मार्गाने आणि शिरपूर ,जळगाव , परसोडा या मार्गाने अमरावती जिल्ह्यात जाता येते, पण तेथे अद्यापही चेकपोस्ट नाही .

🥏 पोलीस योद्धा वृत्त सेवा 🥏
🥏 महेश देवशोध (राठोड ) 🥏
🥏 वर्धा, जिल्हा प्रतिनिधी 🥏

🥏7378703572 🥏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *