BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सिल्लोड बाजार समितीचे शेतकऱ्यांना अवाहन

Summary

सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.29, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी यांनी 31 मार्च ते 8 एप्रिल पर्यन्त संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे. दरम्यान कृषी व शेतकऱ्यांना खरेदी – विक्रीसाठी काही निर्धारित वेळेत मुभा देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने […]

सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.29, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी यांनी 31 मार्च ते 8 एप्रिल पर्यन्त संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे. दरम्यान कृषी व शेतकऱ्यांना खरेदी – विक्रीसाठी काही निर्धारित वेळेत मुभा देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सकाळी 8 ते 12 पर्यंतच बाजार समितीत खरेदी – विक्री सुरू राहणार आहे. याची शेतकरी, बाजार समितीचे आडते, हमाल मापाडी यांनी नोंद घेत कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड व उपबाजार आवार शिवना, भराडी , अजिंठा व अंधारी येथे शेतकऱ्यांनी सकाळी 8 ते 12 पर्यंतच विक्रीस आणावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सिल्लोड बाजार समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे व संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *