“शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे” पक्षाच्या वतीने, मोफत आरोग्य शिबीर

“शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे”
पक्षाच्या वतीने,
न्यु म्हाडा कॉलनी, कोकरी आगार,सायन कोळीवाडा, मुंबई
येथे रविवार,दि.२१/०७/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. ‘मोफत आरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.
मा.खासदार अनिल देसाई साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिबिराला सायन कोळीवाडा विधान सभा संघटक गजानन पाटिल, कार्यालय प्रमुख कालिदास पोटे, कॉंग्रेस नेते सुब्रमणी नायकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते जावेद खान यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पालिकेच्या लोकमान्य टिळक रूग्णालयाच्या सहकार्याने, कामगार नेते डॉ.संजय कांबळे- बापेरकर यांनी आयोजित केलेल्या “आरोग्य शिबिराचा २०० हुन अधिक नागरीकांनी लाभ घेतला. पावसाळी आजारांविषयी जनजागृती व उपाययोजना तसेच विविध साथींचे आजार कसे रोखावेत याबाबत तज्ञ डॉक्टरींनी मार्गदर्शन केले.
शिवसेना शाखा क्र.१७५ चे उपशाखा प्रमुख ईस्माईल खान, सचिन साठे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.