महाराष्ट्र हेडलाइन

लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

Summary

देशात 24 मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लाकडावून करण्यात आला. या काळात डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, शिक्षक, हे सर्व कोरोना योद्धे, जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता निस्वार्थपणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढा देत होते. […]

देशात 24 मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लाकडावून करण्यात आला. या काळात डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, शिक्षक, हे सर्व कोरोना योद्धे, जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता निस्वार्थपणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढा देत होते. या कोरोना योद्धाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने त्यांचा नुकताच सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हा कृतज्ञता सत्कार सोहळा लायन्स क्लबच्या अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती लायन्स क्लबचे पदाधिकारी इंजिनीयर विलास साखरे, प्राचार्य डॉ राजेश चंदनपाठ, विनोद इटकेलवार (नागपुर), लायन्स क्लबचे सचिव सतीश पवार, कोषाध्यक्ष मंजुषा मोरे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. प्रशांत कारेकर, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. देवयानी पोटे, डॉ. श्रावंती कोलुरू, डॉ. मीनाक्षी खोब्रागडे, डॉ. पवन कोकरे , डॉ. मनीषा नागफासे, डॉ. सुप्रिया सातपुते, डॉ. स्वीटी उंदीरवाडे, आरोग्य कर्मचारी गणेश कुळमेथे (धानोरा), मोनिका नारनवरे, देविदास टिंगुसले (सफाई कामगार), अबुल बांबोळे, गौरव सहारे, रुचिता सयाम (स्टाफ नर्स), उमेश वेलादी( ब्रदर ) , अनिल कतलपवार, अतिक दुधे, रोहन मधुमटके, धीरज खेवले (ब्रदर), निखिल जारोंडे, अमित कोकोडे, तर शिक्षकांमधून कुमारी प्रतिक्षा आयनवार, अनिल सहारे, विद्या साळवे, या सर्वांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच लायन्स क्लबच्या सदस्य शालिनी कुमरे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचासुद्धा लायन्स क्लबच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबचे सचिव सतीश पवार यांनी केले तर संचालन संध्याताई चिलम वार व उपस्थितांचे आभार डॉ. सुरेश लडके यांनी मानले.
यावेळी लायन्स क्लबच्या उपाध्यक्षा परविन भामाणी, सहसचिव महेश बोरेवार, माजी अध्यक्ष मदत भाई जीवानी, ज्येष्ठ सदस्य भुजंगराव हिरे, प्रभू सादमवार, प्रा. देवानंद कामडी, दीपक मोरे, गिरीश कुक्कुडपवार, नवीनभाई उनाडकाट, स्मिता लडके, सुचिता कांमडी, चिलमवार साहेब, शालिनी कुमरे, ममता कुकुडपवार , संजय बारापात्रे आदी लॉयन सदस्य उपस्थित होते.

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *