BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

लाखोटीया भुतडा विद्यालय कोंढाळी जि नागपूर येथे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम – 2024

Summary

संवाददाता -कोंढाली /काटोल -दुर्गाप्रसाद पांडे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी दि 17 मार्च 2024ला आयोजित केली होती . सदर परीक्षेला उत्तम प्रतिसाद मिळाला .कोंढाळी येथे लाखोटीया भुतडा विद्यालय,लोणकरण राठी प्राथमिक शाळा,ला भू सीबीएसई कॉन्व्हेंट, जि प शाळा आदी ठिकाणी […]

संवाददाता -कोंढाली /काटोल -दुर्गाप्रसाद पांडे
पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी दि 17 मार्च 2024ला आयोजित केली होती . सदर परीक्षेला उत्तम प्रतिसाद मिळाला .कोंढाळी येथे लाखोटीया भुतडा विद्यालय,लोणकरण राठी प्राथमिक शाळा,ला भू सीबीएसई कॉन्व्हेंट, जि प शाळा आदी ठिकाणी परीक्षा केंद्र निश्चित झाले होते .अशी माहिती केंद्रप्रमुख नीलकंठ लोहकरे यांनी दिली. परिसरात त्रिमूर्ती विद्यालय दुधाळा येथे सुद्धा केंद्र होते. नवभारत साक्षरता चाचणी परीक्षेला सर्वस्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे आयोजकांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर सौ नागपुरे मॅडम यांनी भेट देऊन आढावा घेतला. काटोल तालुक्यात बीईओ नरेश भोयर यांचे मार्गदर्शनात परीक्षा यशस्वी पार पडल्या. कोंढाळी लाखोटीया परीक्षा केंद्रात कोंढाळी, धुरखेडा, जामगड, तरोडा परिसरातील निरक्षर मध्यम वयीन व वृद्ध महिला पुरुषांनी सहभाग घेतला होता. परीक्षा केंद्रावर प्राचार्य यांचे मार्गदर्शनात केंद्रप्रमुख शैलेश चव्हाण, रवींद्र जायभाये, कोरडे मॅडम, उपमुख्याध्यापक कैलास थुल, यादव पंधराम,प्रकाश मलवे, शुभम राऊत, किशोर कुंभरे आदींची उपस्थिती व सहकार्य लाभले. परीक्षा केंद्र भेटीत केंद्रप्रमुख व निरीक्षकांनी सुंदर आयोजनाबद्दल कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *