BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

लाखोटिया भुतडा हायस्कूल कोंढाळीची चारूल यशोदा दिनेश नासरे आउट ऑफ आउट 100% !

Summary

वार्ताहर- कोंढाळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने 27 रोजी दुपारी 01-00 वाजता 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन जाहीर केला आहे. दहावीच्या परिक्षेत येथील लाखोटिया भुतडा हायस्कूलमधून ३५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ३५० विद्यार्थी पास झाले, आणि हायस्कूलचा […]

वार्ताहर- कोंढाळी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने 27 रोजी दुपारी 01-00 वाजता 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन जाहीर केला आहे. दहावीच्या परिक्षेत येथील
लाखोटिया भुतडा हायस्कूलमधून ३५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ३५० विद्यार्थी पास झाले, आणि हायस्कूलचा निकाल ९८.३१% लागला. यामध्ये ११२ डिस्टिंक्शन ग्रेड, 1४० प्रथम श्रेणी, ८७ द्वितीय श्रेणी आणि ११ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. यात चारूल नासरे १००%, चेतना युवराज नागपुरे-९६%,भुमीका सुभाष पोकळे-९३.२०%,जानवी राजु डांगरे-९२.६०%,
मानसी विनोद लाडके ९२.२० या शाळेतील टाॅप फाईव्ह
यांनी गुणांक मिळाले -.तर १६विद्यार्थांना ९०टक्के च्या वर ‌ गुणांक मिळविला आहे. हे विशेष!
यामध्ये लखोटिया भुतडा हायस्कूल चा 98.31% निकाल लागला.
लखोटिया भुतडा हायस्कूल चे संचालक मंडळाचे अध्यक्ष राजेश राठी, सचिव डॉ.शामसुंदर लद्धड, उपाध्यक्षा रेखा राठी, कोषाध्यक्ष मधुसूदन राठी, संचालक राहुल लद्धड यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्राचार्य -सुधीरबुटे, उप प्राचार्य कैलास थुल पर्यवेक्षक मनोज ढाले हरिष राठी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंतांचे या प्रसंगी अभिनंदन करण्यात के ले. संचालन व आभार परिक्षा परिक्षा प्रमुख सुनिल सोलव यांनी केले
*गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार28ला*
गुणवंत विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव सोहळा 28मे रोजी सकाळी 09वाजता लाखोटिया भुतड़ा कनिष्ठ महाविद्यालयच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती प्राचार्य सुधीर बुटे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *