लस घेतल्यानंतर ताप का येतो?? – संशोधक नानासाहेब थोरात.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 29 एप्रिल 2021
कोरोनाची लस घेतल्या नंतर ताप का येतोय? हा प्रश्न लस घेतलेल्या आणि त्यांनी लस घेतली नाही अशा प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे असे जगजाहीर असलेल्या नागरिकांकडुन बोलले जात आहे.ताप काही लोकांना येतो काहींना येत नाही नाही, काहींना पहिला डोज घेतल्यावर येतोय तर काहींना दुसरा डोज घेतल्यावर येतोय. काहींना दोन्ही डोज घेतल्यावर सुद्धा येत नाही, काहींना अंगदुखी पण होते, का होतेय असे? नक्की लस शरीरामध्ये गेल्यावर कोणती क्रिया होतेय. ताप किंवा अंगदुखी हि लसीमुळे होतेय कि अजून दुसरे काही कारण असतेय? या प्रश्नाच्या उत्तरसाठी आधी आपण आपल्या शरीरातील काही क्रियांची थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे. आपल्या शरीरच्या रोजच्या काही क्रिया निश्चित असतात, जसे कि आपण जेवण करतो, त्याचे पचन होते. आपण जे जेवण घेतो ते सगळे पदार्थ शरीरच्या बाहेरचे असतात पण ते शरीराला माहित असतात तसेच त्यातील जे गरजेचे आहे (प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स) तेच आपल्या रक्तात घेतले जातात आणि नको असलेले बाहेर टाकले जातात. याउलट आपल्या शरीरात तोंडावाटे किंवा नाकावाटे धूळ गेली तर त्याविरुद्ध शरीराची लगेच प्रतिक्रिया येते जसे कि शींका येणे किंवा सर्दी होणे. याचे कारण म्हणजे धूळ हि शरीराला गरजेची नाही. तसेच काही आपल्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टरीया गेल्यानंतर होते. आपली प्रतिकारशक्तीच्या काही पेशी त्याना लगेच ओळखतात आणि त्यांची माहिती प्रतिकार शक्तीच्या इतर पेशींना दिली जाते जेणेकरून नको असलेले व्हायरस किंवा बॅक्टरीया शरीराबाहेर काढले जातील, हे काम प्रतिकारशक्तीच्या काही पेशी अँटीबॉडीज तयार करून करतात. त्याचबरोबर या शरीराबाहेरील शत्रूंचा हल्ला झाला आहे याची माहिती मेंदूला पण दिली जाते, मेंदूतील एक भाग प्रतिकार शक्तीला याच्या विरुद्धची तयार करण्याचे काम करतो. हि सर्व क्रिया वेगाने पार पडत असते. या सर्व क्रियांची माहिती रक्तावाटे शरीरातील सर्व भागांना दिली जाते, तसेच अतिशय वेगाने याची तयारी करता यावी म्हणून आपली रक्तपुरवठा करणारी यंत्रणा रक्ताचा पुरवठा वेगाने करते . त्यामुळे काही वेळांसाठी आपला रक्तदाब सुद्धा वाढतो. अचानक अशा प्रकारची परिस्थिती उध्दभवल्यामुळे प्रतिकारशक्ती आणि मेंदू एकत्रितपणे काम करून शरीराचे तापमान वाढवतात जेणेकरून बाहेरून आलेला शत्रू यामुळे विचलित होऊन तो निघून किंवा त्याचे शरीरातच विघटन होईल. याला प्रतिकारशक्तीची पहिली प्रतिक्रिया असेही म्हणता येईल.
आता लस दिल्यानंतर काय होते ?? . लस म्हणजे लुळे पांगळे झालेले व्हायरस -बॅक्टरीया किंवा त्यांचा एक छोटासा भाग असतो. लस टोचल्यानंतर काही क्षणातच ती रक्तात गेली कि तिथे असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींना त्याची माहिती मिळते. लगेचच काही क्रिया होण्यास सुरवात होते, कारण रोगप्रतिकारक शक्ती लसीमधील व्हायरस किंवा बॅक्टरीयाच्या घटकांना बाहेरूनच आलेले शत्रू म्हणून ग्राह्य धरते. लसीमध्ये असलेले घटक जसे …जसे रक्तात मिसळतात किंवा शरीररचनाशास्त्र नुसार शरिरात पसरले कि शरीराची म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती आणि मेंदूची प्रतिक्रिया म्हणजेच ताप यायला सुरवात होते, काही वेळांसाठी मग रक्त वेगाने शरीरात फिरू लागते आणि रक्तदाब वाढतो त्यामुळे अंगदुखीला सुरवात होते. या सर्व क्रिया प्रतिक्रिया काही तासां पासून ते दोन-तीन दिवस चालू राहतात आणि एखादा का लसीतील घटकांची प्रतिकारक शक्तीला ओळख झाली आणि अँटीबॉडीज तयार व्हायला सुरवात झाली कि ताप अंगदुखी कमी व्हायला सुरवात होते. साधारणपणे सर्वच प्रकारच्या लसींना याचं प्रकारची प्रतिक्रिया शरीराकडून मिळते.