महाराष्ट्र हेडलाइन

मोदी यांनी प्रधानमंत्री राहाण्याचा नैतिक अधिकार गमावला — अरुंधती रॉय यांचा सनसनाटी आरोप

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि ६. मे २०२१ पंतप्रधान नरेंद मोदीला कळकळीची विनंती अरुंधती रॉय यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की , कृपया बाजूला व्हा. आम्हाला सरकारची आत्यंतिक गरज आहे. आणि आमच्याकडे ते नाहीये. आमचा वायू संपत आहे. आम्ही […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि ६. मे २०२१
पंतप्रधान नरेंद मोदीला कळकळीची विनंती अरुंधती रॉय यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की , कृपया बाजूला व्हा. आम्हाला सरकारची आत्यंतिक गरज आहे. आणि आमच्याकडे ते नाहीये. आमचा वायू संपत आहे. आम्ही मरत आहोत. आमच्या हाती मदत असतांनाही ती कशी वापरता येईल हे सांगणारी व्यवस्थाच जागेवर नाही. काय करता येईल? आताच, याच घडीला? आम्ही 2024 पर्यंत वाट पाहू शकत नाही. माझ्या सारख्या व्यक्तीने कधी कल्पनाच केली नव्हती की एकदिवस असा येईल जेंव्हा आम्हाला पंतप्रधान नरेंद मोदी कडे याचना करावी लागेल, कशासाठीही. व्यक्तिगतरित्या, मी असं करण्याऐवजी तुरुंगात जाणं पसंत करीन. परंतु आज, जेंव्हा आम्ही मरत आहोत घरात, रस्त्यांवर, हॉस्पिटलच्या कार पार्किंग मध्ये, मोठ्या शहरांत, लहान नगरात, गावखेडय़ात आणि जंगलात आणि शेतात – मी, एक सामान्य नागरिक, माझा स्वाभिमान गिळून लाखों सहकारी नागरिकांसोबत मिसळून सांगत आहे की कृपया सर, कृपया, बाजूला व्हा. किमान या क्षणाला तरी. मी आपणास याचना करत आहे, पायउतार व्हा. हे तुम्ही निर्माण केलेलेच संकट आहे. तुम्ही त्यावर मार्ग काढू शकत नाही. तुम्ही फक्त ही परिस्थिती अधिक खराब करू शकता. हा वायरस भीती आणि वैर आणि अज्ञानाच्या वातावरणात फोफावतो. तुम्ही जेंव्हा बोलणाऱ्यांची बोलतीबंद करता तेंव्हा हा वायरस फोफावतो. तुम्ही जेंव्हा मिडियाला इथपर्यंत ताब्यात राखता की खरं सत्य हे आंतरराष्टीय मिडिया द्वारे समोर येते तेंव्हा हां वायरस फोफावतो. तो फोफावतो जेंव्हा तुमच्याकडे असा पंतप्रधान असतो ज्यानं इतकी वर्ष खुर्चीवर असतांनाही एकही पत्रकार परिषद घेतली नाही, जो प्रश्नांना घाबरतो, सुन्न करणाऱ्या अशा आजच्या भयावह घडीला ही.
जर तुम्ही गेला नाहीत तर, काहीही कारण नसतांनाही, आम्ही लाखों मरणार. म्हणून, निघा आता. झोला उठा के.. तुमची गौरव-प्रतिष्ठा शाबूत ठेवून. ध्यान-साधना व एकांतवास यांचं मस्त आयुष्य तुम्हाला जगता येईल. जे तुम्हाला जगावं वाटतं असं तुम्ही स्वतः म्हणत असता. मात्र, प्रचंड प्रमाणात होणारे हे मृत्यू तुम्ही जर असेच होवू दिलेत तर मग मात्र तुम्हाला तसं जगणं शक्य होणार नाही. तुमच्या पक्षात असे अनेक आहेत जे तुमची सध्या जागा घेवू शकतात. अशी लोकं ज्यांना ठावूक आहे की या संकटसमयी आपल्या राजकीय विरोधकांनाही सोबत घ्यायचं असतं. तो कोणीही व्यक्ती का असेना – तुमच्या पक्षातला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंजुरीने – सरकारचे व संकट व्यवस्थापन कमिटी चे ही नेतृत्व करू शकेल. राज्यांतील मुख्यमंत्री काही प्रतिनिधींना निवडतील म्हणजे सर्वच पक्षांना प्रतिनिधित्व मिळाल्याचं जाणवेल. राष्ट्रीय पक्ष म्हणून कॉंग्रेसही या कमिटीत असू शकेल. आणि तद्नंतर वैज्ञानिक, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, डॉक्टर्स, अनुभवी नोकरशहा. तुम्हाला हे कळणार नाही, पण यालाच लोकशाही म्हणतात. तुम्हाला हवी तशी विरोध-मुक्त लोकशाही नसते. त्याला जुलूमशाही म्हणतात. हा वायरस जुलूमशाह वर प्रेम करतो.
हे जर तुम्ही आताच केलं नाहीतर, जसं या (रोगाच्या) उद्रेकाला आंतराष्ट्रीय समस्या म्हणून पाहिलं जातंय, जे तुमच्या अकार्यक्षमतेमुळे घडलंय, ते इत्तर देशांना आपल्या देशाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचं, देशावर ताबा घेण्याचं कायदेशीर निमित्त देईल. असं झालं तर आम्ही जे अतिकष्टाने लढून सार्वभौमत्व मिळविलंय त्याच्याशी तडजोड होईल व आपला देश पुन्हा एकदा एखादी वसाहत बनून जाईल. या शक्यतेला गंभीरपणे घ्यावं लागेल. तिला दुर्लक्षून चालणार नाही.
म्हणून, कृपया निघा. हे सर्वांत जास्त जबाबदारीचे काम आहे तुम्हाला करण्यासाठी. आमचे पंतप्रधान राहण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावून बसलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *