माजी आमदार नितीन पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून झाला जाहीर प्रवेश
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20210402-WA0000.jpg)
( शेख चांद प्रतिनिधी ) दि.1, माजी आमदार तसेच औरंगाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला .
महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे खंदे समर्थक राहिलेले नितीन पाटील यांनी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने जोरदार बाजी मारली. याच पॅनल मधून माजी आमदार नितीन पाटील यांचाही भरघोस मतांनी विजय झाला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर नितीन पाटील यांच्या शिवसेना प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
आज मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याहस्ते नितीन पाटील यांचा शिवबंधन घालून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. यावेळी पालकमंत्री ना. सुभाष देसाई, मंत्री ना. संदीपान भुमरे, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर यांची उपस्थिती होती.