महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वंचित सह तीन पक्षांची राज्यपालांकडे मागणी.

Summary

सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहे. भाजपने आता गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करित रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेही या संपूर्ण प्रकरणाची […]

सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहे. भाजपने आता गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करित रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.
प्रकाश आंबेडकर व राज्यपालांची भेट झाली त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाली आणि मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी कसे वसूल करायला सांगितले, हे स्पष्ट केले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे. राज्यपालांनी वेळ दिला आहे. हे सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले राज्यपालांना भेटणार आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने, राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याच्या मागणीचे पत्र अमित शाह यांच्याकडे देणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
केंद्राने हस्तक्षेप करण्याची राज ठाकरेंनी मागणी केली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे गंभीर आहेच. पण मूळ प्रश्न अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचे धाडस होणार नाही. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. केंद्रीय तपास संस्थांमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यानंतर फटाक्यांच्या माळा लागतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे, अशी आमची मागणी आहे. सुधीर मुनगंटीवार राज्यपाल यांना भेटणार असुन सर्व घोटाळे उघडकीस आले पाहिजेत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई
प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *