हेडलाइन

भंडारा येथे कोरोना संदर्भात मंत्री तसेच अधिकारिंची आढावा बैठक

Summary

अमर वासनिक/न्यूज एडिटर आज भंडारा येथे खासदार श्री प्रफुल पटेल, राज्याचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे, गृहमंत्री व गोंदिया जिल्हाचे पालकमंत्री श्री अनिल देशमुख, वैदयकिय शिक्षणमंत्री श्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाबाबद संबंधीत विभागाचे अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा […]


अमर वासनिक/न्यूज एडिटर
आज भंडारा येथे खासदार श्री प्रफुल पटेल, राज्याचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे, गृहमंत्री व गोंदिया जिल्हाचे पालकमंत्री श्री अनिल देशमुख, वैदयकिय शिक्षणमंत्री श्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाबाबद संबंधीत विभागाचे अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे कोरोना विषाणु प्रादुर्भाव संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी भंडारा येथे RTPCR मशीन त्वरित उपलब्ध करण्याचे आदेश दिले . ऑक्सिजन टॅंक चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच रेमडीसिवीर इंजेकशनच्या तुटवडा पडू नये या करता संबधीत अधिकारीयांना आदेश दिले. तुमसर, पवनी, लाखांदूर, साकोली येथे कोविड सेंटर सुरू करण्याचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी मंजुरीचे आदेश दिले. शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढविणे आणि खासगी रुग्णलयात कोविड सेंटर च्या मंजुरी बाबत चर्चा करण्यात आली . खासदार श्री प्रफुल पटेलनी गृह मंत्री श्री अनिल देशमुख यांना ऑक्सिजनची कालाबाजारी वर फौजदारी कारवाहीचे करण्याचे निर्देश दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना सुद्धा आवश्यक ती काळजी घ्यावी अशा सूचना केल्या . सर्वश्री जिल्हाधिकारी संदीप कदम ,पोलीस अधीक्षक वसंत जाधव ,संचालक श्रीमती अर्चना पाटील (आरोग्य विभाग, पुणे) जिल्ह्याशल्य चिकित्सक खंडाते , जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती माथुरकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी ,आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन , माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार प्रकाश गजभिये , नाना पंचबुधे, धनंजय दलाल, सुनील फुंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *