दुर्गापुर उपक्षेत्रात मृत अवस्थेत आढळला बिबट
चन्द्रपुर:- 9 एप्रिल ला चन्द्रपुर परिक्षेत्रातील उपक्षेत्र दुर्गापुर , पायली-भटाळी मधील कक्ष क्रमांक 880 मध्ये वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान बिबट मृत अवस्तेत आढळला. सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकार, एको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे घटनास्थळी दाखल झाले व मृत बिबट ची मृतदेहाची पाहणी करीत मृतदेह हा शाबूत स्थितीत होता. सदर बिबट हा मादा प्रजातीचा होता, दोन वन्यप्रान्याच्या झुंजीत सदर बिबट मृत पावल्याचा अंदाज वनविभागाने लगावला. शवविच्छेदन केल्यावर सदर मृत बिबट चे दहन करण्यात आले.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर