ट्रकच्या धडकेत पायदळी वयोवृध्दाचा मुत्यु. ट्रक चालकाने विरूध्द दिशेने वाहन चालवुन धडक मारल्याने पायदळी वयोवृध्दाचा मुत्यु.
कन्हान : – कन्हान पो स्टे पासुन २ कि मी अंतरावर नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील नखाते ज्वेलर्स समोर कांद्री कन्हान येथे पायदळ रस्ता पार करताना ट्रक चालकाने विरूध्द दिशेने वाहन भरधाव चालवुन धडक मारल्याने झालेल्या अपघातात पायदळी अशोक मोटवानी गंभीर जख्मी होऊन त्यांचा मुत्यु झाला.
नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील नखाते ज्वेलर्स कांद्री कन्हानच्या समोर बुधवार (दि.३०) मार्च ला सायंकाळी ७.१५ वाजता दरम्यान अशोक आशन दास मोटवानी वय ६२ वर्ष रा. कांद्री कन्हान हे त्यांच्या घरून पायदळ रस्ता पार करित असताना एम एच ४० एन ७५६६ क्रमांकाच्या दहाचाकी टिपर ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन विरूध्द दिशेने भरधाव वेगा ने व निष्काळजीपणे चालवुन पायदळी वयोवृध्दास जोरदार धडक मारून पसार झाला. या अपघातात अशोक मोटवानी गंभीर जख्मी झाल्याने नागपुर येथी ल खाजगी रूग्णालयात उपचारार्थ नेताना रस्त्यातच मुत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फिर्यादी प्रकाश आशनदास मोटवानी वय ५३ वर्ष रा पटेल नगर पिपरी कन्हान यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी आरोपी वाहन चालका विरूध्द कलम २७९, ३०४ (अ) भादंवि सहकलम १८४ मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करून आरोपी वाहन चालकाचा शोध घेत पुढील तपास पोहवा श्री नरेश वरखडे करित आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535