महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा बँक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची बाजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अर्जुन पा.गाढे, सुरेखा प्रभाकर ( आबा ) काळे यांचा दणदणीत विजय सिल्लोड शिवसेनेकडून जल्लोष साजरा

Summary

सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.22, औरंगाबाद जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या शेतकरी विकास पॅनलने जोरदार बाजी मारत जिल्हा बँकेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत. जिल्हा बँकेच्या […]

सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.22, औरंगाबाद जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या शेतकरी विकास पॅनलने जोरदार बाजी मारत जिल्हा बँकेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, सोयगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे यांच्या पत्नी सुरेखाताई प्रभाकर काळे यांनी दणदणीत विजय मिळविल्याने सिल्लोड शिवसेनेच्या वतीने पक्ष कार्यालय सेना भवन समोर फटाक्यांची आतषबाजी करीत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, नगरसेवक शंकरराव खांडवे, रामसेट कटारिया, मतीन देशमुख, सत्तार हुसेन, रवी रासने, फहिम पठाण, सुशील गोसावी, संतोष धाडगे,शेख शमीम आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतमाल प्रक्रिया मतदार संघातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 40 पैकी 33, सोसायटी मतदार संघातून अर्जुन पा. गाढे यांना 84 पैकी 63 तर सोयगावच्या सुरेखा प्रभाकर ( आबा ) काळे यांनी सोसायटी मतदार संघातून 34 पैकी 22 मते घेवून विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *