गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब गडचिरोलीचे सुपुत्र एड प्रमोदजी तरारे यांची राज्याच्या धर्मदाय आयुक्त पदी निवड राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ऍड प्रमोदजी तरारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
गडचिरोली येथील रहिवासी आणि सध्या नंदुरबार येथे कार्यरत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एड. प्रमोदजी तरारे यांची धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर मा. उच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. ऍड. प्रमोद तरारे यांनी १९८९ पासून गडचिरोली येथून वकिली व्यवसाय सुरू केला. सन 2008 मध्ये त्यांनी न्यायालयीन परीक्षा उत्तीर्ण केली व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून विविध जिल्ह्यात कामकाज केले.
सन 2018 मध्ये त्यांचे प्रमोशन झाले व नंदुरबार येथे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून मा. उच्च न्यायालयाने त्यांची नियुक्ती केली. एड. प्रमोदजी तरारे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन मा. उच्च न्यायालयाने त्यांची महाराष्ट्र राज्याच्या धर्मदाय आयुक्त पदी नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडे शिफारस केली. महाराष्ट्र शासनाने माननीय उच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून 20 एप्रिल 2021 रोजी श्री प्रमोदजी तरारे यांची धर्मदाय आयुक्त पदी नियुक्ती केली आहे.गडचिरोली च्या सुपुत्रची राज्याच्या धर्मदाय आयुक्तपदी निवड होणे ही जिल्ह्यासाठी व ओबीसी समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर