BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

कोरोना महामारीच्या कार्यकाळात वनविभागाचे वस्तीगृह वनकर्मचारी व त्यांचे कुंटुबातील सदस्यांकरीता ,कोवीड सेंटर ,म्हणून मान्यता देण्याची मागणी .

Summary

विभागीय प्रतिनिधी ( चक्रधर मेश्राम भामरागडच्या जंगलातून ) दि. २९ एप्रिल २०२१ , सद्या कोरोना या विषाणूने सर्वत्र महाभयानक असे थैमान घातलेले आहे ,अशा वेळी जनहितार्थ सदैव सेवारत असलेले वनकर्मचारी कोरोना विषाणू च्या महामारीला वेळेवर उपचारा अभावी बळी पडत असल्याचे […]

विभागीय प्रतिनिधी
( चक्रधर मेश्राम भामरागडच्या जंगलातून ) दि. २९ एप्रिल २०२१
, सद्या कोरोना या विषाणूने सर्वत्र महाभयानक असे थैमान घातलेले आहे ,अशा वेळी जनहितार्थ सदैव सेवारत असलेले वनकर्मचारी कोरोना विषाणू च्या महामारीला वेळेवर उपचारा अभावी बळी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तेव्हा जिल्ह्यातील वन कर्मचारी आणि त्यांच्या परिवारात कोरोनाने आजारी असलेल्या सदस्यांना विलीनीकरणास आणि उपचारासाठी वनविभागाचे सध्या स्थितीत वापरात नसलेले गडचिरोली येथील वस्तीगृह (परिक्षेत्राचे बाजूला सद्या बंद स्थितीत आहे, ) कोव्हीड सेंटर म्हणून मान्यता मिळवून त्यात सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास वनविभाच्या कुंटुबातील सदस्यांना मोफत व यौग्य उपचार मिळून अनेक बांधवांचे प्राण वाचविण्यास यशस्वी होवू शकतो. या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देवून कार्यवाही करावी अशी मागणी प्रभाकर सोनडवले उपाध्यक्ष कास्ट्राईब महासंघ , रमेश घुटके , सिद्धार्थ गोवर्धन महासचिव, नामदेव बनसोड कार्याध्यक्ष, सुनील देठे अध्यक गडचिरोली, सचिव धाम्मरा व दुर्गमवार, विनोद धात्रक, संदीप शेंडे अध्यक्ष वडसा आणि इतर पदाधिकारी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांचेकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *