*कोरची तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा देताना तारांबळ* *तांत्रिक कारणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची गोंडवाना विद्यापीठाने काळजी घ्यावी* *सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर*
Summary
कोरची तालुक्यातील कमी नेटवर्क व इंटरनेट मधील तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची मोबाईलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे आढळून आले आहे. काही विद्यार्थ्यांनी कोरची पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरील चिचगड या गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर […]
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20210311-WA0031.jpg)
कोरची तालुक्यातील कमी नेटवर्क व इंटरनेट मधील तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची मोबाईलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे आढळून आले आहे. काही विद्यार्थ्यांनी कोरची पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरील चिचगड या गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन, तर काहींनी नेटवर्कच्या शोधात थेट छत्तीसगड सीमेपर्यंत धाव घेत पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला, तर काही विद्यार्थ्यांना नेटवर्कच उपलब्ध न झाल्यामुळे पेपर सोडवण्यापासून वंचित राहावे लागले, तर काहींनी जंगलात बसून पेपर सोडविल्याचे स्थानिका कडून कळले आहे. नेटवर्क कमी असणे किंवा नसणे ही तांत्रिक बाब असल्यामुळे, तांत्रिक कारणामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची गोंडवाना विद्यापीठाने काळजी घ्यावी अशी विनंती सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी गोंडवाना विद्यापीठाला केली आहे.
कोरची तालुका निर्मितीपासून या तालुक्यात फक्त बीएसएनएल चेच नेटवर्क आहे.येथे आवश्यकतेपेक्षा कमी नेटवर्क असल्यामुळे ब्रॉड बँड सुद्धा काम करत नाही. दुसऱ्या टावर ची गरज असताना सुद्धा तो लावल्या जात नाही,येथील दूरसंचार विभागात एकही जबाबदार अधिकारी नसल्याचे, तसेच एका चौकीदारच्या भरोशावर ग्राहकांना सेवा दिली जात असल्याचे कळते आहे. तसेच दिवसातून पाच सहा वेळा लोडशेडींग होत असल्यामुळे मुळे, स्थानिक नागरिक व विद्यार्थी त्रस्त आहेत. त्यामुळे वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना संसर्गामुळे मागील एक वर्षापासून नागपूर, मुंबई, पुणे व इतर ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी स्व गावी येऊन आहेत. त्यांचेही ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत परंतु नेटवर्कच्या लपंडावामुळे त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
*विद्यापीठाची समंजस भूमिका*
यासंदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधला असता तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास अडथळा निर्माण झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना कळवावे अशा विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेण्याची व्यवस्था करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही अशी स्पष्ट व समंजस भूमिका गोंडवाना विद्यापीठाने घेतली असून तशा प्रकारचे परिपत्रक विद्यापीठाने काढले असल्याचे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी सांगितले आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर