कोबाड गांधींचा व्यथित करणारा प्रश्न?? – मिलिंद भोवर
Summary
विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. भामरागड परिसरातून दि. 29 एप्रिल 2019 :- माओवादी हिंसाचाराच्या सर्वच्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त झालेल्या कोबाड गांधी यांनी कारागृहातील आठवणींसंदर्भात लिहिलेल्या, Roli Books प्रकाशित ‘Fractured Freedom’ या आपल्या पुस्तकात एक प्रश्न उपस्थित केलाय.ते म्हणतात: _”लोकं विचारतात […]
विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. भामरागड परिसरातून दि. 29 एप्रिल 2019 :-
माओवादी हिंसाचाराच्या सर्वच्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त झालेल्या कोबाड गांधी यांनी कारागृहातील आठवणींसंदर्भात लिहिलेल्या, Roli Books प्रकाशित ‘Fractured Freedom’ या आपल्या पुस्तकात एक प्रश्न उपस्थित केलाय.ते म्हणतात:
_”लोकं विचारतात (काही गुन्हा नसतांना) दहा वर्ष तुरुंगात का ? हा प्रश्न सत्ताधारी व त्यांच्या कायदा प्रणालीला विचारला पाहिजे. ही कायदा व्यवस्था जी करोडोंच्या व्यवहारात अडकलेल्या मोठ्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी तर गोर गरिबांसाठी कार्य करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याना तुरुंगात डांबण्यासाठी पोलीस व सरकार आपल्या मर्जीनुसार अक्षरशः वाकवु शकतात. हे तसं आश्चर्यकारक नाही कारण कायद्याची संपूर्ण संरचना आज ही ब्रिटिशांनी निर्माण केलेली जुनी वसाहतवादीच आहे. अलीकडे तर आपण हे जास्तच पहात आहोत कारण राज्य व केंद्र सरकार दोन्हीही विरोधातला आवाज चिरडण्यासाठी या व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करू लागलेत. आपल्या विरोधातील सुराला ब्रिटिश जसे देशविरोधी मानायचे तसंच आजचा राज्यकर्ता मानू लागलाय. मग, आपण एक वर्तुळ पूर्ण केलंय की काय ? आपण, फक्त गोऱ्यांची जागा काळयानी घेतलेल्या, वसाहतवाद सारख्या राज्यात पुन्हा पोहोचलोय की काय ?” नुकतंच सुरतच्या कोर्टानं SIMI संघटनेशी संबंधित अतिरेकी म्हणून 19 वर्षांपूर्वी अटक केलेल्या 127 जणांना निर्दोष मुक्त केलंय..हे पाहता कोबाड गांधींचा प्रश्न अधिकच संयुक्तिक नव्हे का ? कोबाड यांची 10 वर्ष तर सुरत मधिल 127 जणांची तब्बल 19 वर्ष कोण भरून देईल…? ?
असंच भीमा कोरेगांव केसमध्ये घडू नये म्हणून या केसचा खटला लवकरात लवकर सुरू करायला लावून अटक केलेल्यांच्या आयुष्याची बहूमोल वर्ष आपण निश्चितच वाचवु शकतो… असे स्पष्ट मत मिलिंद भवार पँथर्स यांनी व्यक्त केले आहे.