केंद्र शासन पुरस्कृत अमृत_योजना अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणाच्या कामास वेग…
सातत्याने केलेल्या पाठपुरव्याला यश आले असून केंद्र शासन पुरस्कृत अमृत_अभियान अंतर्गत कल्याण डोंबिवली येथील २७ गावांकरिता पाणीपुरवठा योजना राबवली जात असून या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत या भागांकरिता ३३ जलकुंभ व त्यांना आवश्यक असलेल्या जलवाहिन्या व जलवितरण वाहिन्यांचा समावेश आहे. सदर योजनेअंतर्गत कल्याण – शीळ रस्त्यावर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. अमृत योजनेद्वारे २७ गावांमधील कोळेगांव, नांदिवली, सोनारपाडा या गावांमध्ये प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन नुकतेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते पार पडले असून प्रत्यक्ष कामाला वेग मिळाला आहे.
जगदीश जावळे
पाटील ठाणे
जिल्हा महाराष्ट्र राज्य