BREAKING NEWS:
देश महाराष्ट्र हेडलाइन

कंगना रणौतवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने ती वान्द्रा पोलिस स्टेशन च्या चकरा मारण्यास मजबूर

Summary

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची पोलीस चौकशी होणार आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल आज त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या आहेत. सध्या कंगना व रंगोली यांचे पोलीस स्टेशनच्या आवातारातील फोटो सोशल मीडियावर […]

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची पोलीस चौकशी होणार आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल आज त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या आहेत. सध्या कंगना व रंगोली यांचे पोलीस स्टेशनच्या आवातारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे, द्वेष पसरविणे यामुळे कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चौकशीसाठी तिला ३ ते ४ वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे कंगनाने दुर्लक्ष केलं होतं. अखेर आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिने वांद्रे न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना व रंगोली या दोघींना अटकेपासून संरक्षण देत आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कंगना आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे कंगनाविरोधात दाखल करण्यात आले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना व रंगोली सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त झाल्या होत्या. मात्र, यापैकी कंगनाच्या एका ट्विटवर साहिल नामक व्यक्तीने आक्षेप घेत वांद्रे न्यायालयात कंगना आणि रंगोली विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर कंगनावर देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांअंतर्गंत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना जबाब नोंदविण्यासाठी नोटीस पाठविली होती. मात्र, कंगनाने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र, आज कंगना स्वत: हून चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे.
नवी मुबई न्युज रिपोटर
प्रशांत मानसिंग जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *